शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते विजय चौक येथील गणेश मंडळाचा वाद्य पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते विजय चौक येथील गणेश मंडळाचा वाद्य पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न
धाराशिव -विजय चौक तरुण गणेश मंडळ विजय चौक, धाराशिव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मंडळाचे मार्गदर्शक श्री. सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते श्री गणेश मंडळाच्या वाद्य पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
येथील गणेश मंडळाला श्री. सुरज साळुंके यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ढोल, ताशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रविवार दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात या वाद्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, विनोद गपाट, मालोजीराव साळुंके नागेश जगदाळे, अमर माळी, संदीप इंगळे, दत्ता लोकरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, धाराशिव शहरातील आजोबा गणपती म्हणून ओळख असलेल्या या गणेश मंडळाला सत्तर वर्षांची परंपरा आहे. या मंडळामार्फत दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गोरगरीब विद्यार्थांना साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
पत्रकार संघाचा उत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार देखील मंडळाला प्राप्त झालेला आहे.
यावर्षीचा गणेशोत्सवही विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
या वाद्य पूजन कार्यक्रमास गणेश मंडळाचे अध्यक्ष अविनाश टापरे, उपाध्यक्ष तेजस (बबलू) नवले, खजिनदार गणेश चौधरी, नितीन देवकाते, महेश देवकते , राहुल मोरे, महेश छबिले, बालाजी राऊत, अमर मडके, रंजीत चौधरी, रजनीकांत मळाले, सागर इरकर, बालाजी सूर्यवंशी, बालाजी कदम, जगदीश मडके, महेश गवंडी, योगेश तुपे, सुरज राऊत, अजिंक्य आगलावे,सौरभ निंबाळकर, अक्षय माळी, आबा देवकते, बबलू वंढरे , गणेश जाधव, विनोद गिड्डे, निलेश मडके, विशाल गिड्डे, कृष्णा घोणे, मयूर माळी, सागर माळी, सचिन मडके, आदित्य गवंडी,खंडू मासाळ, दिनेश तुपे, शिवम माने, ओमकार वांढरे ओम जाधव,परसू शेटे, शुभम पांढरे, अक्षय शेंडगे, आकाश माने तसेच विजय चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक, आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.