महिला उद्योजिका संघ" या अंतर्गत कामेगाव ता. जि.धाराशिव येथील महिलांची "महिला उद्योग शाळा आणि मुलींची उद्योग शाळा" सुरू करण्याबाबत महिलांची बैठक यशस्वी संपन्न
*"महिला उद्योजिका संघ" या अंतर्गत कामेगाव ता. जि.धाराशिव येथील महिलांची "महिला उद्योग शाळा आणि मुलींची उद्योग शाळा" सुरू करण्याबाबत महिलांची बैठक यशस्वी संपन्न
*महिला उद्योजिका संघ* अंतर्गत सुरू असलेल्या महिला उद्योजिका सदस्य नोंदणी आणि उद्योग शाळा करण्यासाठी *शनिवार दिनांक 10.08.2024 रोजी कामेगाव* येथील मुली व महिलांनी सहभाग नोंदवून पुढाकार घेतला आहे.
या प्रसंगी संस्थापक पांडुरंग घोडके यांनी उद्योजिका म्हणून ज्यांना सदस्य व्हायचे आहे त्यांना प्रकल्पाची माहिती सांगितली तसेच व्यवसायाबद्दल प्रतिक्रिया आणि अडचणी जाणून घेतल्या. याशिवाय ग्रामीण भागात कोणकोणते व्यवसाय करता येऊ शकतात याबद्दल चर्चा केली.तसेच त्यांना शासनाच्या विविध योजना,कर्ज प्रक्रिया,आणि विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजनांची माहिती सांगितली..
ज्या महिला व्यवसाय करतात त्यांना कोणकोणत्या व्यवसायाची गावात गरज आहे.तसेच व्यवसायासाठी उद्योजिका म्हणून नोंदणी करण्यासाठी किती कुटुंबाचा सर्व्हे करू शकतात याबद्दल चर्चा केली.सोबतच किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांच्यासाठी उद्योग शाळा सुरू करून त्या माध्यमातून मुलींना व्यावहारिक व व्यावसायिक ज्ञान देण्यासाठी कार्यशाळा घेण्या बद्दल मार्गदर्शन केले.याशिवाय ज्यांना सदस्य होण्यासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना 👇👇 खालील लिंक गुगलवर भरायला सांगितले...
https://forms.gle/FQpY1ieQqu38KorZ7
या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे..
धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
पांडुरंग घोडके, संस्थापक
महिला उद्योजिका संघ, धाराशिव, महाराष्ट्र..9422151230