आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान
आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान राहुल कोरे आळणीकर . डॉक्टर दिव्या अरुण वीर हिने आपल्या आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करून कुटुंबाचा अभिमान वाढवला धाराशिव तालुक्यातील आळणी गावासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे. गावातील विद्यमान सरपंच प्रमोद वीर यांची पुतणी तसेच कैलास वाशी येथील माजी सरपंच अरुण पापावीर यांची कन्या डॉ. दिव्या अरुण वीर यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातून येत असतानाही दिव्या यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. मेडिकलसारख्या कठीण शिक्षणप्रवासात त्यांनी अनेक अडचणींवर मात करत अखेर यशाचे शिखर गाठले. दिव्या यांच्या या यशामागे त्यांचे आई-वडील, कुटुंबीय यांचे सततचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या यशा...