सुधिर अण्णा पाटील स्वगृही परतले भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश
धाराशिव दि.३१.(प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधिर अण्णा पाटील यांनी मुंबई येथे शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षप्रवेश केला,
एकेकाळी शिवसेनेमध्ये उप जिल्हाप्रमुख नंतर सहा वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून कार्य केलेले त्याच काळात त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले त्यामध्ये घागर मोर्चा असो की महावितरण कार्यालय असो की जिल्हाधिकारी कार्यालय अशा सर्व ठिकाणी हजारोंच्या संख्येने आंदोलने केली होती, नंतरच्या काळात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी त्यांचे पटत नसल्याने त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता,
आज परत एकदा सुधिर अण्णा पाटील हे आपल्या स्वगृही महणजेच शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला आता नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.