वडगाव ( सि ) जि. प. प्रशालेचा विद्यार्थी शिवम वाडकर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हयात प्रथम कु.सुप्रिया काळे जिल्हयात पाचवी
वडगाव ( सि ) जि. प. प्रशालेचा विद्यार्थी शिवम वाडकर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हयात प्रथम
कु.सुप्रिया काळे जिल्हयात पाचवी
धाराशिव / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर ता.जि. धाराशिव या शाळेतील विद्यार्थी इयत्ता आठवीचा विद्यार्थी शिवम अभिमान वाडकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर पाचवी मधील विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया केशव काळे हिने जिल्ह्यातून पाचवा क्रमांक मिळवला आहे आणि इयत्ता आठवीचा विद्यार्थी गौरव बापू पाटील याने जिल्ह्यातून 89 वा क्रमांक मिळवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीमती निर्मला गुरव , श्रीमती सरोजा पाटील ,श्रीमती सुचेता शेलार , श्रीमती रजनी रावळे श्रीमती ज्योती राऊत , मेहबूब काझी , भूषण मदने यांचे शाळेचे मुख्याध्यापक नाईकवाडे व्ही एस , वडगाव ( सि ) चे भूमिपुत्र तथा लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे , शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील, गुरुजी विचार मंच तसेच वडगाव ( सि ) चे सर्व ग्रामस्थ यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे