नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राष्टीय कार्यशाळा आयोजित कार्यक्रमात पोलीस पाटील हाजगुडे यांचा सत्कार*

*नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राष्टीय कार्यशाळा आयोजित कार्यक्रमात पोलीस पाटील हाजगुडे यांचा सत्कार*
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण सोहळा, नवी दिल्ली.
  दि. 26/06/2024 राष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम NDMC नवी दिल्ली येथे संपन्न झाला. आयुष मेडिकल फौंडेशन आणि इंटिग्रॅटेड अचिव्हर्स अवॉर्ड 2024 यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दिमाखदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फिलिपीन्स चे राजदूत श्री.एच.ई.बसेम एफ.हेल्लीस 
केंद्रीय मंत्री मा. प्रतापराव जाधव (आयुष मंत्रालय भारत सरकार ),मा. रामदासजी आठवले (सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री ), मा.श्री.ओमराजे निंबाळकर (संसद सदस्य धाराशिव लोकसभा ),मा.श्री. राजाभाऊ वाजे (संसद सदस्य, खासदार नाशिक )डॉ.रोशन भड (AIIMS Delhi),डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष आयुषमान भारत महाराष्ट्र राज्य ),प्रा.श्रीम.तनुजा नेसारी (Director of all India institute of Ayurveda),डॉ.शरद मारोती पोरते (professor & physician Aryuved De-addiction unit ministry of Ayush Govt. Of India).
कार्यक्रमा चे प्रास्ताविक आयुष मेडिकल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संदीपजी तांबारे सर यांनी केले. व्यसनमुक्ती साठी देशभरात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यसनमुक्तीची चळवळ समाजातील तळागाळातील सामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होणे आणि नशामुक्त भारत अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या मिश्किल भाषणातून नशामुक्तीचा संदेश देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.धाराशिव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मा.ओमराजे निंबाळकर यांनी व्यसनमुक्तीची सुरुवात ही स्वतःपासून करण्याचा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रसंगातून दिला.तसेच धाराशिव तालुक्यातील तुगांव (ढोकी ) गावच्या पोलीस पाटील सौ. श्रुतिका हाजगुडे यांना या कार्क्रमात पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र  मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.
  शेवटी उपस्थितांचे आभार इंटिग्रेटेड अचिव्हर च्या संस्थापिका श्रीम. जुही सभार्वल यांनी व्यक्त केले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक