राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी रक्तदान, सन्मानचिन्ह, मिठाईवाटप आदी उपक्रम राबविले

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी 

रक्तदान, सन्मानचिन्ह, मिठाईवाटप आदी उपक्रम राबविले 
धाराशिव दि २६

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक २६ जून रोजी बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक धाराशिव येथे विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली .
धाराशिव शहरात रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे अनेक युवकांनी जयंतीनिमित्त रक्तदान केले .यावेळी पत्रकार ,शेतकरी, दिव्यांग ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार स्मारक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला . उपस्थितांना मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा केला .
यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे म्हणाले की केंद्र शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न हा पुरस्कार द्यावा .राज्य शासनाने सामाजिक समता दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी .धाराशिव शहरात ऐतिहासिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करावे .
यावेळी स्मारक समितीचे मार्गदर्शक धर्मवीर कदम ,माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मारक समितीचे सचिव बालाजी तांबे यांनी केले . या कार्यक्रमास  शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्निल शिंगाडे ,डॉ . प्रतापसिंह पाटील ,सुरज साळुंके, अमरसिह देशमुख,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बी.जी अरवत ,समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप ,रवि माळाळे ,संतोष जाधव, भा .न .शेळके, राजसिंह राजेनिंबाळकर, विष्णू इंगळे, रोहित पडवळ, शीला उंबरे, रोहित निंबाळकर,लक्ष्मण माने,आकाश तावडे,रवी कोरे, संकेत सूर्यवंशी ,मसुद शेख, अजित गुंड,ॲड . तसलीम काजी, उमेश राजेनिंबाळकर ,प्रा .अभिमान हंगरगेकर, दलित मित्र शंकर खुणे, कुणाल निंबाळकर, पल्लू काकडे,प्रा .रवि सुरवसे, विजय गायकवाड ,प्रदीप सूर्यवंशी, अभिजीत सूर्यवंशी, धर्मराज सूर्यवंशी, बिलाल रझवी,आकाश मुंडे, मुकुंद घाटगे, बाळासाहेब माने, सुरेश शेळके, शेषनात वाघ, गोविंद जाधव ,रणजीत रणदिवे, निलेश साळुंके, सागर माळाळे, गिरीश माळाळे, आकाश राठोड, ॲड .घनशाम रितापुरे, गोविंद कस्पटे ,विवेक महाजन, शहजाद शेख, सोमनाथ गुरव,विजयकुमार पवार, संभाजी फरताडे, मयूर काकडे,अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी,नीलकंठ कोळगे,रमाकांत हाजगुडे, प्रभाकर लोंढे अमोल राजेंनिंबाळकर, सचिन चौरे, राहुल कोरे ,नितीन इंगळे, धनराज नवले, सुनील जाधव,आशिष साळुंखे आदीसह शाहू महाराज प्रेमी नागरिक तसेच पोद्दार इंग्लिश स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .शेवटी उपस्थितांचे आभार रोहित पडवळ यांनी मानले .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक