शिष्टमंडळावर विश्वास दाखविल्याबद्दल जरांगे पाटील यांचे आभार मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध : आमदार राणाजगजितसिंह पाटील

शिष्टमंडळावर विश्वास दाखविल्याबद्दल जरांगे पाटील यांचे आभार मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध : आमदार राणाजगजितसिंह पाटील

जरांगे-पाटील यांची प्रकृती उपोषणामुळे खालावत आहे. मराठा समाजाच्या जनभावना राज्य सरकारने ध्यानात घेवून तत्काळ प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाचे आरक्षण जाहीर करणे आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीने शिष्टमंडळ पाठविले. शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक संवाद साधला आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार अतिशय सकारात्मक पध्दतीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. पुढील महिनाभरात त्याअनुषंगाने सर्व प्रक्रियांची पूर्तता केली जाईलअसेही शासनाच्यावतीने शिष्टमंडळाने जाहीर केले असल्याची माहिती शिष्टमंडळाचे सदस्य तथा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे ८ जूनपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावली होती. याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि अभिमन्यू पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून राज्य सरकारने सकारात्मक संवाद करणे अत्यावश्यक असल्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली खासदार संदिपान भुमरे,आमदार राणाजगजितसिंह पाटील

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतआमदार मेघना बोर्डीकर यांचे शिष्टमंडळ सरकारच्यावतीने बोलणी करण्यासाठी अंतरवली सराटी येथे पाठविले होते.

 या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्यासोबत सर्वच मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. सरकार अतिशय सकारात्मक असल्याचे सांगत सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पाऊले उचलण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे प्रक्रियेला उशिर झाला असला तरी पुढील महिनाभराच्या कालावधीत आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील आणि जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सगेसोयरे अंमलबजावणी तातडीने केली जाईलआंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील आणि न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया रबाविण्यात येईल. त्यासाठी शुक्रवारपासूनच मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईलअसेही शिष्टमंडळाने आश्वस्त केले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथे रूग्णाललयात दाखल केले असून रुग्णालयात जाऊन ना.शंभूराजे देसाई,संदीपान भुमरे व आ.राणा पाटील यांनी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांसोबत चर्चा केली.जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून आ.पाटील यांनी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्यावतीने केलेली विनंती मान्य करून उपोषण स्थगित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक