लोकसभा निवडणुकीतील राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात यावा* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी*
लोकसभा निवडणुकीतील राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात यावा*
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी*
धाराशिव जिल्ह्यामध्ये 7 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुनियोजित पणे पार पडली आहे.
प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेसाठी 10% टक्के कर्मचारी हे राखीव कर्मचारी म्हणून घेतले जातात. या सर्व राखीव कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयापासून जवळपास 100 ते 150 किलोमीटर अंतरावरील विधानसभा मतदारसंघात जाऊन आपले निवडणूक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे.
प्रत्यक्ष मतदान बुथवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाचे मानधन (भत्ता) देण्यात आले, परंतु राखीव कर्मचाऱ्यांना निवडणुक कामाचे मानधन (भत्ता) देण्यात आलेले नाही.
तरी सर्व राखीव कर्मचाऱ्यांना सुद्धा निवडणुक कामाचा भत्ता देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, चिटणीस महेबूब काझी, नगर परिषद विभाग जिल्हा प्रमुख राजेंद्र पवार, शाहू शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव, कळंब तालुकाध्यक्ष महेंद्र रणदिवे, जुनी पेन्शन आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन भांडे, धाराशिव तालुका अध्यक्ष नागनाथ मुडबे, शिवाजी साखरे, मिलिंद धावारे, लहू जगताप, प्रफुल्ल झाडबुके, सुनील आरेकर, बाळासाहेब कांबळे, रविराज राठोड, मनोज कुरे, श्रीहरी बिडवे, शिवाजी कोटलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.