अशोक_जगदाळे यांनी तुळजापूर विधानसभेसाठी थोपटले दंड

#अशोक_जगदाळे यांनी  तुळजापूर विधानसभेसाठी थोपटले दंड
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव/प्रतिनिधी
धाराशिव(उस्मानाबाद) लोकसभेची निवडणूक ७ मे रोजी नुकतीच पार पडली, लोकसभे निवडणूकीचा निकाल हा ४ जूनला लागणार आहे. प्रामुख्याने ही लढत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या मध्ये झाली. ४ जूनला कोण गुलाल उधळणार? या कडे सर्व मतदारांचे लक्ष लागले. लोकसभेच्या प्रचार तोफा शमल्या नाही, तोच सर्व पक्षातील अनेक पुढाऱ्यांना येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही पुढाऱ्यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यानच आपण विधानसभा लढवणार आहोत, त्यामुळे इच्छुक नेत्यांनी,कार्यकर्त्यांना लोकसभे बरोबर विधानसभेची पाया भरणी केल्याचे पहावयास मिळत आहे.
 त्याचं अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार )चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी तुळजापूर विधानसभे साठी दंड थोपटलेले दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत अशोक जगदाळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची तुळजापूर विधानसभेचे धुरा सांभाळली होती. लोकसभा निवडणूकी दरम्यान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव  सुनील चव्हाण यांनी अचानक भाजप मध्ये प्रवेश केल्याने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना तुळजापूर तालुक्यातुन एक साईड मतदान होईल असे वाटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तुळजापूर शहरात सभा घेतली आणि वारे फिरविले. तुळजापूर तालुक्यात परस्पर विरोधी उमेदवारात तगडी लढत झाली. यावेळी शरद पवार साहेब हे तुळजापूर शहरात मुक्कामी राहिले होते, यावेळी अशोक जगदाळे व शरद पवार यांच्या मध्ये तुळजापूर विधानसभेच्या अनुषंगाने एक तासभर चर्चा झाल्याचे बोले जात होते, यावेळी पवार यांनी जगदाळे यांना विधानसभेची तयार करण्यास सांगितले असल्याचे जगदाळे यांचे कार्यकर्ते सांगत होते. तोच धागा पकडून अशोक जगदाळे व त्यांचे कार्यकर्ते हे सध्या धाराशिव तालुक्यातील तुळजापूर विधानसभेच्या ७२ गावामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन कॉर्नर बैठका घेत असल्याचे दिसत आहेत. यावेळी अशोक जगदाळे यांना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
 अशोक जगदाळे यांनी २०१९ ची तुळजापूर विधानसभा निवडणूक ही बहुजन वंचित आघाडी कडून लढवली होती, यावेळी त्यांनी ३७ हजारच्या आसपास मते घेतली होती. तशी २०१९ विधानसभे तगडी फाईट ही भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यामध्ये झाली होती.यावेळी भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील हे २३१६९ मतांनी विजयी झाले होते.  या निवडणुकीत अशोक जगदाळे यांच्या उमेदवारीमुळे राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय सोपा झाल्याचे बोले जात होते.
सध्या विधानसभेचे चित्र स्पष्ट होईला काही महिने बाकी असले तरी अशोक जगदाळे यांनी आपली तुळजापूर विधानसभेसाठी स्वतःची प्रचार यंत्रणा कामास लावली आहे. महाविकास आघाडीने जर अशोक जगदाळे यांना उमेदवारी दिली तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामध्ये कडवी झुंज पाहिला मिळेल .सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अशी ही चर्चा सुरू आहे की, महाविकास आघाडीकडून अशोक जगदाळे हेच योग्य उमेदवार राहतील व आमदार पाटील यांना हेच आव्हान देऊ शकतील.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक