जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलं, युवामोर्चा आक्रमक; धाराशिव शहरात आंदोलन.

जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलंयुवामोर्चा आक्रमकधाराशिव शहरात आंदोलन.

प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन केले. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी स्टंट बाज आव्हाडांविरोधात भाजपा-युवा मोर्चा-एस सी मोर्चा  चांगलाच आक्रमक झाला आहे व निषेध करत हा मुद्दा जोरदार निदर्शन करत आहे

धाराशिव शहरात भाजपा-युवमोर्चाचे निदर्शने

कालच्या या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं असून भाजपने तर आव्हांडाविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. भाजप ,युवामोर्चा चे नेतेकार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरांत आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहेनिषेधाच्या घोषणाही देण्यात येत आहेत. धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आंदोलक जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. भाजपच्यावतीने डॉ. बाबासाहेब चौकात निदर्शने करण्यात आले. चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून  हे आंदोलन करण्यात आले. तसेच त्या ठिकाणीच आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले . यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना हाकलून काढण्याची मागणी करत कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले,

तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी आव्हाड यांच्यावर टिका करत आव्हाड हे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने चुकीचे विधाने करत असून महाराष्ट्राला अशोभनीय कृत्य करन्यातते नेहमीच अग्रेसर असतात असे विचार महाराष्ट्राच्या एकजुटीला घातक असून जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली,यावेळी किसान मोर्चा प्रदेश सचिव रामदास अण्णा कोळगेप्र का स प्रवीण पाठक ,प्रदेश उपाध्यक्ष महिला अस्मिता कांबळे ,जिल्हाउपाध्यक्ष सुनील काकडे ,सरचिटणीस इंद्रजित देवकते शहर अध्यक्ष अभय इंगळे ,सिधोजी राजेनिंबाळकर ,एस सी मोर्चा अध्यक्ष अमोल पेठे ,नरेन वाघमारेअजित खापरे,विद्या मानेगणेश मोरेरंजित देशमुखअभिजीत काकडे अमोल राजेनिंबाळकर ,नाना कदम ,दाजी आप्पा पवारशेषेराव उंबरे ,रोहीत देशमुखप्रमोद बचाटेप्रसाद मुंडे ,सुनिल पंगुडवाले ,शाहदे भाऊप्रवीण सिरसाठे ,मेसा जानराव ,सागर दंडनाईककिशोर पवार,उदय बनसोडेआनंद भालेरावपुष्पकांत माळाळे, जे के,अतुल कावरेदादा पवारअरुण पेठे, संग्राम बनसोडेनानासाहेब पाटीलशिवानी परदेशीनवनाथ सोकरसार्थक पाटीलकृष्णा उंबरे ,प्रमोद हावळे ,यांच्यासह मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्तेपदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक