यशदा मल्टीस्टेट येथे नागदे साहेबांचा सत्कार समारंभ-

यशदा मल्टीस्टेट येथे नागदे साहेबांचा सत्कार समारंभ-
 धाराशिव जिल्हयाचा अभिमान असणारे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन मराठवाडा खादी भांडार नांदेडचे चेअरमन मान्यवर वसंत संभाजी नागदेसाहेब  सहकारमहर्षी अनुभवाचा आणि माणुसकीचा महामेरू असणारे नागदे दादा यांना सर्वोकृष्ट चेअरमन म्हणून पुणे येथे RBI कडून सन्मानित करण्यात  आले त्याबद्दल यशदा मल्टीस्टेट को ऑप क्रे . सो. लि .धाराशिव येथे साहेबांना सत्कारीत करण्यात आले या प्रसंगी माझ्यासह CA मोसीन शेख,दिलीप पडवळ ,संचालक सुभाष पवार,मुख्याधिकारी श्री प्रकाश गरड व यशदा चे सर्व अधिकारी आणि शाखाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी नागदे साहेबांनी सहकार क्षेत्रात काम करताना जनसामान्यांच्या अडचणी समजून घेणे किती आवश्यक आहे आणि सकारात्मक वृत्तीने सर्व जग जिंकण्याची तयारी होते असे उद्गार काढले व सुधीर दादांनी यशदा मल्टीस्टेट आपल्या आदर्शांचे व जेष्ठांच्या अनुभवाचे अनुकरण करीत विकासाची नवी शिखरे सर करण्यासाठी कटीबद्ध आहे असे उद्गार काढले  आणि सर्वांनी नागदे साहेबांना शुभेच्छा दिल्या व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमा ची सांगता झाली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक