24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा...* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी*


24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा...* 

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी* 
*धाराशिव दिनांक 14 मे ..*
जिल्ह्यातील शिक्षकांना 24 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिल्या जाणा-या निवड श्रेणीचा लाभ गेल्या 30 वर्षापासून मिळालेला नसून, दरवर्षी पात्र शिक्षकांच्या 20% प्रमाणात ती देण्यात यावी असे शासन आदेश असतानाही धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक यापासून वंचित आहेत. 

24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव तात्काळ मागवून घेऊन नियमानुसार देय असणा-या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा अन्यथा 3 जून नंतर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर टप्प्या टप्प्याने आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे. 

आचारसंहिता संपल्यानंतर या संदर्भात तातडीने कारवाई करून पात्र शिक्षकांना लाभ देण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले आहे. 

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, चिटणीस महेबूब काझी, नगरपरिषद जिल्हा प्रमुख राजेंद्र पवार, शाहू शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश भालेराव, कळंब तालुकाध्यक्ष महेंद्र रणदिवे, जुनी पेन्शन आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन भांडे, धाराशिव तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे, शिवाजी साखरे, मिलिंद धावारे, लहू जगताप, प्रफुल्ल झाडबुके, सुनील आरेकर, बाळासाहेब कांबळे, रविराज राठोड, मनोज कुरे, श्रीहरी बिडवे, शिवाजी कोटलवार, मालोजी वाघमारे, दयानंद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक