खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

         

जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य करावे लागते. गेल्या पाच वर्षात मी खासदार हे पद जनसेवेत म्हणून स्वीकारले आहे. जनतेची छोटी मोठी कामे माझी स्वतःची अडचण समजून ती दूर करण्याचा प्रयत्न केला. यातून सर्वसामान्य जनतेचे विद्युत वितरण संदर्भात असलेले प्रश्न हॉस्पिटलच्या संदर्भात असलेले प्रश्न कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भात असलेले प्रश्न तसेच बँकांच्या संदर्भात असलेले प्रश्न तत्काळ निराकरण झाल्याने जनतेचा माझ्यावरील विश्वास वाढत गेला यातून माझा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क निर्माण झाला आहे. विद्यमान विरोधी पक्ष उमेदवार माझ्याविरुद्ध सातत्याने गरळ ओळखण्याचे काम करत असतात. मी मागील अनेक वर्षांपासून जनसेवक आहे.

          माझ्या कार्यालयाकडे आलेला कोणताही नागरिक काम झाले नाही म्हणून परत गेला नाही. एखाद्यी व्यक्ती कार्यालयातून पत्राविना गेली असे आजपर्यंत तरी माझ्या निदर्शनास आले नाही माझ्या कार्यालयाकडून आवश्यक त्या पत्रासह त्या व्यक्तीची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

          पाटील कुटुंब हे केवळ सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या सूत्राचा वापर करून मागील 40-45 वर्षापासून जिल्ह्यातील सत्ता कारण करत असून आत्ताही त्यांना केवळ प्रतिष्ठेसाठी सत्ता हवी आहे. आपण केलेले भ्रष्टाचार झाकण्यासाठी म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. शरदचंद्र पवार साहेबांनी 45 वर्ष ज्या घराला मंत्रिपद दिले लाल दिव्याची गाडी दिली याच लोकांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपण जिल्ह्याचा विकास करणारा असल्याचा दावा केला.

           मागील 40 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयातील महत्त्वाच्या मंत्री म्हणून जबाबदाऱ्या  पार पाडणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत जिल्ह्यात कोणताही विकास न करता स्वतःचा विकास केला आहे.

           भारत शासनाच्या आकांक्षा जिल्हा दारिद्र्यरेषेतील जिल्हा ही ओळख केवळ पाटील कुटुंबियांमुळेच निर्माण झालेली आहे याच कालावधीमध्ये ते भारतातील श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये होते यावरूनच आपणास सत्ता आणि राजकारण यासाठीच त्यांना लोकसभा ही लढवायची आहे काही वर्षांपूर्वी भाजपात गेलेले राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव लोकसभेकरीता आपल्या पत्नीचे नाव पुढे करून उमेदवारी ही पदरी पाडून घेतली पण येथील जनता त्यांना स्वीकारणार नाही. राणाजगजीतसिंह पाटील यांचे विकास ध्येयधोरण हे केवळ बेगडी व ढोंगीपणाचे प्रतीक आहे. जिल्ह्यातील अनेक उद्योग बंद पाडण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. उपळा गावाजवळ असलेल्या व्हिडिओकॉन कंपनी बंद पाडण्यापासून ते तेरणा साखर कारखाना, वाघोली येथील सूतगिरणी तसेच तुळजाई साखर कारखाना ह्या उद्योगापैकी बरेच उद्योग बंद पाडून नागरिकांना मिळणारा रोजगार काढून घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांकडून लाखो करोडो रुपये भाग भांडवलाच्या स्वरूपात गोळा करून तुळजाई साखर कारखान्याचे पायाभरणी केल्यानंतर पुढे किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला हे जिल्हाभरातील सर्व लोकांना सर्वश्रुत आहे.

          पाटील कुटुंबीय हे सत्तेला चिटकुन बसणारे कुटुंब आहे सत्तेशिवाय या कुटुंबास चैन पडत नाही आजपर्यंत मी केवळ जनसेवा केली आहे यापुढे जनसेवक  म्हणूनच काम करेन आश्वासन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक