शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर


शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- 
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

राहुल कोरे आळणीकर
धाराशिव-  40 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काल तुळजापूर तालुक्यातील सावरगाव काटी व अन्य गावातील गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा असे प्रतिपादन करून मागील दोन वर्षाखाली शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर 11000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होते परंतु सदर दर वृद्धी होताच भाजपा प्रणित सरकारने सोयाबीन, सोया पेंड, व सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी करून सोयाबीनचे देशांतर्गत भाव पाडून 4000 प्रती क्विंटलवर आणून ठेवले. यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीवर आधारित उत्पन्नाचे दर पाडण्याचा भाजप सरकारने सपाटाच लावला सध्या गाईच्या दुधाला बावीस रुपये प्रति लिटर दर मिळत असून बाटली बंद पाणी वीस रुपये प्रति लिटर प्रमाणे बाजारात विकले जाते हे विदारक सत्य जनतेच्या समोर प्रचार सभेच्या दरम्यान मांडले. टोमॅटोचे दर वाढल्यानंतर आयात करुन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर कमी केले. याच बरोबर शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढत असताना लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात शुल्कात वाढ केली तसेच कांदा निर्यातीवर बंदी घातली या कांदा निर्यात बंदीचा परिणाम म्हणून द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. श्रीलंका ,बांगलादेश , नेपाळ आदी देशांनी भारतातील द्राक्ष आयात केले नाही याचा परिणाम म्हणून देशांतर्गत द्राक्षाचे बाजार भाव पडले.  यानंतर ऊसाचे उत्पादन चांगले असताना सुद्धा इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली व शेतकऱ्यांच्या ऊसाचे दर पाडले. 

 
  मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी हमी दिलेली होती. मागील काहीवर्षात रासायीनक खतांच्या किंमती कमी होत्या. भाजप सरकारच्या काळात सहाशे रुपये प्रती 50 किलो गोणीवरुन 1680 प्रती गोणी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 1000 रु ते 1400 रुपयापर्यंत मिळणाऱ्या सोयाबीन बियाना बॅगेची किंमत 4500/- रु प्रती बॅग इतकी महाग करुन शेतक्यांना लागणारे आहे. खत बियानेवरील 18% जी.एस.टी. घेतली जात आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करण्याचे पाप या सरकारने केले आहे.  त्यांनी  शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.  
  यावेळी रामचंद्र आलुरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,अशोक भाऊ जगदाळे, मुकुंद दादा डोंगरे,अभिजीत चव्हाण,ऋषी मगर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील,तालुकप्रमुख जगन्नाथ गवळी, संजय भोसले, रामेश्वर तोडकरी, सुनिल जाधव, प्रदिप मगर, सुजीत हंगरगेकर, जितेंद्र कानाडे,गौरीशंकर कोडगिरे,राजकुमार बोबडे, श्वेता ताई दुरुगकर,संगिताताई काळे,तुळशीराम बोबडे,शाम भाऊ पवार यांच्यासह  उपस्थित होते. 
 

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक