महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडामतदारांनी भूलथापांना बळी पडू नये: धनंजय सावंतमाणकेश्वर, वांगी, आष्टा येथे शिवसेनेचे धनंजय सावंत यांची प्रचारसभा

महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा

मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये: धनंजय सावंत

माणकेश्वर, वांगीआष्टा येथे शिवसेनेचे धनंजय सावंत यांची प्रचारसभा

 

धाराशिवदि. 29 -

महाविकास आघाडीचा उमेदवार सध्या खोटे बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. त्यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडतामोदीविरोधी भूमिका असलेल्या विरोधी उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्याअसे आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले.

उमरगा तालुक्यातील वांगी व आष्टा येथे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पुढे बोलताना धनंजय सावंत म्हणाले कीविरोधकांनी आजपर्यंत कोणती कामे केलीत्याचा हिशोब नागरिकांसमोर मांडला पाहिजे. केवळ खोट्या बाता करून लोकांसमोर संभ्रम निर्माण करणे बंद करावे. जे बोलायचे असेल ते पुराव्यांनिशी बोलावे. महायुती सरकार हे कामातून बोलणारे सरकार आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ विकास आणि काम पाहिजे. ही निवडणूक कुठल्याही दोन पक्षांमधील निवडणूक नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. यामध्ये प्रत्येक मताला फार महत्त्व आहे. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावेअसे आवाहन धनंजय सावंत यांनी केले.

यावेळी दत्ता साळुंकेगौतम लटकेबाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकरदत्ता मोहितेअण्णासाहेब देशमुखनवनाथ जगतापबाळासाहेब क्षीरसागरमहायुतीचे स्थानिक पदाधिकारीकार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक