महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या - कल्याण दळे
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या - कल्याण दळे
धाराशिव -
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई (ए) आणि मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन बारा बलुतेदार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केले.
धाराशिव येथील काँग्रेस भवन येथे बारा बलुतेदार संघटनेची बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, 25एप्रिल रोजी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा पद्मसिंह पाटील व राणा पाटील यांनी कसा भकास केला.किती आश्वासने पाळली यांचा पाडाच वाचला.तसेच शहरातील महात्मा बसवेश्वर चौक, महात्मा जोतिबा फुले चौक,अशा विविध चौकाचे सुशोभीकरण आमदार फंडातून केल्याचे सांगितले.
कल्याण दळे हे पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जनतेच्या आणि विशेषतः बारा बलुतेदार घटकाला न्याय देऊ शकते. भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात फक्त घोषणाबाजी करत जनतेला झुलवत ठेवले. महागाई कमी करण्याची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेची लूट केली. शेतीमालाचे भाव पाडून खते बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूचे भाव वाढवले. बड्या उद्योगपतींचे 68 हजार कोटींचे कर्ज माफ करून जनतेची लूट करणाऱ्या भाजपा सरकारला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देत महाविकास आघाडी सरकार केंद्रात स्थापन करण्यासाठी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशनच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा संघटनेचे कार्याध्यक्ष इलियास मुजावर यांनी जाहीर केला.
बैठकीस शिवसेना उपनेते व स्टार प्रचारक लक्ष्मण वडीले,धनंजय शिंगाडे बारा बलुतेदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष,फकिरा दलाचे संस्थापक अध्यक्ष सतिश कसबे,धनंजय राऊत तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,चर्मकार संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष नितिन शेरखाने,शिवसेना धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, ॲड. परवेज काझी, इलियास मुजावर, चर्मकार संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड. गणपती कांबळे, गोसावी समाजाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अभिजित गिरी,अक्षय माने,गोंधळी समाजाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश लोंढे,कृष्णा भोसले,मैंदाड बप्पा, दिनेश बंडगर,गुड्डू शेख, जगन्नाथ पवार,गणेश वाघमारे,राजु आडे,गणेश राऊत,अवधूत पेठे, फुलचंद माळी, समिर सुरवसे, महादेव पेठे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.