आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोपसुरेश बिराजदार यांना दावल्याने कार्यकर्ते आक्रमक उमरगा लोहारा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे 'राजीनामे

आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोप
सुरेश बिराजदार यांना दावल्याने कार्यकर्ते आक्रमक उमरगा लोहारा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे 'राजीनामे 
मुरुम : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे घेऊन जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते सुरेश बिराजदार यांना डावलण्यात आले. त्यामुळे इतर पक्षातील नातेगोत्यातील आयात उमेदवारांना संधी दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोप करीत तीव्र भावनेत पक्षश्रेष्ठीवर नाराजगी व्यक्त करून पदाचे राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना गुरुवारी (दि.४) मुंबई येथे पक्ष प्रवेश देऊन घााराशिव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अर्चनाताई पाटील यांना देण्यात आल्याने पक्षातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

पक्षश्रेष्ठीवर नाराजगी व्यक्त करत उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन जाधव, लोकसभा सोशल मीडिया अध्यक्ष शमशोदिन जमादार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दिलेल्या राजीम्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश

उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना पक्षाने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेची तयारी करायला लावून ऐनवेळी त्यांना डावलून इतर पक्षातील उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे, याचा जाहीर निषेध करून पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यातील सर्व भागातील पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याने एकमतला बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसणार का? की पक्षश्रेष्ठीकडून नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार हे आगामी काळात पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक