धाराशिव | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली, बेंबळी, कनगरा, टाकळी (बे) या ठिकाणी प्रचार सभा संपन्न
#धाराशिव | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली, बेंबळी, कनगरा, टाकळी (बे) या ठिकाणी प्रचार सभा संपन्न झाल्या..
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास, कौडगाव एमआयडीसी अशा असंख्य प्रकल्पांमधून संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आदरणीय राणादादा आणि सौ.अर्चनाताई अखंड प्रयत्नशील आहेत..
आपल्या सरकारच्या माध्यमातून राणादादांनी आपल्या गावांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. महायुतीचा आपल्या हक्काचा खासदार असेल तर केंद्रातून अधिक मोठ्या प्रमाणात निधी आणणे आपल्याला शक्य होईल..
गेल्या १० वर्षांच्या विकासाची प्रचंड गती पाहता पुन्हा एकदा मोदी सरकार येणे गरजेचे आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारालाच मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याची आपल्या सर्वांचे जबाबदारी आहे..
येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये अत्यंत विचारपूर्वक मतदान करून महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यानिमित्ताने केले..
#धाराशिव #लोकसभा #निवडणूक #Dharashiv #Loksabha