उमरगा तालुक्यात महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या गावभेटीग्रामीण भागाच्या विकासासाठी महायुती सदैव तत्पर
- Get link
- X
- Other Apps
उमरगा तालुक्यात महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या गावभेटी
ग्रामीण भागाच्या विकासासाठी महायुती सदैव तत्पर
उमरगा, लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार सदैव तत्पर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात महायुती सरकार जनतेसाठी काम करत आहे. आजवरच्या सहकार्याप्रमाणेच यापुढेही जनतेने साथ द्यावी, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी केले.
उमरगा तालुक्यातील तोरंबा, लोहारा तालुक्यातील धानुरी व अन्य गावांना अर्चनाताई पाटील यांनी भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. तोरंबा येथील मारुती मंदिराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 10 लाख रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून आज गावातील मारुती मंदिराला भव्य स्वरूप आले असल्याचे सांगत या मंदिरात नारळ फोडून उमरगा, लोहारा तालुक्यात अर्चनाताई पाटील यांनी प्रचाराची सुरुवात केली.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार, अभय चालुक्य, शितलताई राहुल पाटील सास्तुरकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधून महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी सुनील माने, दिग्विजय शिंदे, दयानंद गिरी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps