पत्नीचा प्रचार बाजूला ठेऊन #आमदार पती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

#पत्नीचा प्रचार बाजूला ठेऊन #आमदार पती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
धाराशिव - राज्यात अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातही दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, आपल्या पत्नीचा ऐन लोकसभा निवडणुकीतील प्रचार प्रचार बाजूला ठेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. तर, संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन कार्यवाहीच्या सूचनाही केल्या.
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर जोपासलेला बळीराजाचा आंबा झाडावरुन उतरवण्याचं काम सुरू आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे आंबा, द्रांक्षे बागांचे नुकसान झालेृ. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. केवळ पाहणीवरच न थांबता, थेट संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाहीच्या सूचनाही पाटील यांनी केल्या. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूरचे लोकप्रिय आमदार असून पीकवीमा स्पेशालिस्ट म्हणून त्यांची जिल्ह्यात ख्याती आहे. त्यांच्या पत्नी सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील या सध्या उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत. दिनांक १९ रोजी त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. जनसेवेतील त्यांच्या याच स्वभावामुळे मतदार संघातील सर्व नेते व असंख्य नागरिक लक्षणीय संख्येने अर्ज भरतेवेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक