अर्चना पाटील यांचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनमहायुतीच्या एकोप्याची वज्रमूठ; प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती

अर्चना पाटील यांचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन

महायुतीच्या एकोप्याची वज्रमूठप्रचंड जनसमुदायाची उपस्थिती

 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोषहातात पोस्टरझेंडे घेतलेला प्रचंड मोठा जनसमुदाय आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला होता. महायुतीच्या एकोप्याची वज्रमूठ प्रचंड शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून धाराशिवकरांनी अनुभवली.

लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारपालकमंत्री तानाजी सावंतराज्यमंत्री संजय बनसोडेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळेमाजी मंत्री बसवराज पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलआमदार अभिमन्यू आमदार राजाभाऊ राऊतआमदार ज्ञानराज चौगुलेआमदार सतीश चव्हाणआमदार विक्रम काळेमाजी आमदार सुजितसिंह ठाकूर  रिपाइंचे अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ उपस्थित होते.

दरम्यान शहरातील जिजाऊ चौक येथून महायुतीतील राष्ट्रवादीभाजपाशिवसेना शिंदे गटरिपाइं आठवले गटमनसे आदी पक्षांचे पदाधिकारीलोकप्रतिनिधीकार्यकर्त्यांच्या रॅलीस  प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उमेदवार अर्चना पाटील या ग्रामदैवत हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गाहधारासूर मर्दिनी मंदिर व त्यानंतर काळा मारूती मंदिरात दर्शन घेवून रॅलीत सहभागी झाल्या. ही रॅली आर्य समाज चौकसंत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर उमेदवार अर्चना पाटील यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाणमाजी नगराध्यक्ष संपत डोकेबिभीषण काळे यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तर अमित शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटीलआमदार ज्ञानराज चौगुलेराज्यमंत्री संजय बनसोडेआमदार विक्रम काळेआमदार राजाभाऊ राऊतआमदार सतीश चव्हाणआमदार अभिमन्यू पवार,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर  यांची भाषणे झाली.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक