Skip to main content

उमरगा-लोहारा विधानसभा महायुती पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

उमरगा-लोहारा विधानसभा महायुती पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न


राहुल कोरे आळणीकर
 उमरगा-लोहारा विधानसभा महायुती पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न

आपल्या लोकसभा क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी मोदी सरकारच्या विचारसरणीला अनुकूल लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे. मोदीजी यांच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सामाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या असल्याने ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.

देशातील पहिली टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आपल्या कौडगाव एमआयडीसी येथे होत आहे. यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या समवेत व्यापक स्वरूपात आपण काम करत आहोत. आपल्या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. आपली महायुतीची जबाबदारी वाढत आहे.. पाणी, उद्योग, रस्ते, आर्थिक कायापालट यावर आपण ताकतीने काम करणार आहोत. आपणास मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे.

याप्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपले विचार मांडताना, ‘’अर्चनाताई नक्कीच लोकसभेत जाणार, डॉ. पद्मसिंह पाटील यांना जसं लोकसभेत पाठवलं तसंच अर्चनाताईंना देखील आम्ही पाठवणार आहोत.. ताई या सक्षम उमेदवार आहेत. मोदी हे जाती पाती, धर्म न मानणारे पंतप्रधान आहेत. सर्वाधिक मताधिक्य हे उमरगा तालुक्यातून मिळेल, आम्ही शब्दाची पक्की माणसं आहोत.” असे सांगत एकप्रकारे विजयाचा निर्धार व्यक्त केला.

भारत आर्थिक महासत्ता होण्याकडे वेगाने वाटचाल करत असताना सक्षम कायदे आणि निर्णय घेण्याची आवश्यकता असणार आहे. हे कायदे तयार होत असताना आपल्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधीने त्यामध्ये सकारात्मकतेने सहभागी व्हावे अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चना पाटील यांना निवडून परिवर्तन घडविण्याचा निर्धार करण्यात आला. '४०० पार' मध्ये एक जागा आपल्या क्षेत्राची असेल हे निश्चित!

या मेळाव्यासाठी माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार.रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुरेशदाजी बिराजदार, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक