अर्चना पाटील यांना गावोगावी मिळत आहे उस्फूर्त प्रतिसाद
अर्चना पाटील यांना गावोगावी मिळत आहे उस्फूर्त प्रतिसाद
#कळंब | गौर, मोहा, खामसवाडी, गोविंदपूर आदी गावांत प्रचार सभा घेऊन मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.. प्रचार सभांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे..
लोकसभा निवडणूक ही देशाचे पंतप्रधान ठरविण्याची निवडणूक आहे. देशाचा विकास कोण चांगला करू शकतो हे आपण सर्वांनी मिळूनच ठरवायचे आहे. ही निवडणूक गल्लीतील अथवा गावातील प्रश्न सोडवण्याची नाही, तर देशाच्या सर्वांगीण विकासाची आहे. त्यामुळे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळाला मतदान करावे.. घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान, घड्याळाला मतदान म्हणजे देशहिताला मतदान..
राज्यात आपले सरकार आल्यावर लोकसभा क्षेत्रातील अनेक मोठी कामे मार्गी लागली आहेत.. त्यामुळे आपल्या महायुतीचा हक्काचा खासदार असेल तरच केंद्रातून मोठ्या प्रमाणात विकास निधी, योजना, मोठे प्रकल्प येऊ शकतात. म्हणूनच मतदार राजाने विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन घड्याळाला मतदान करावे, ही विनंती..
यावेळी ज्येष्ठ नेते श्री.विजेंद्र अण्णा चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.अजित पिंगळे, श्री.रामहरी शिंदे, श्री.संजय पाटील, श्री.अच्युतराव मडके, राष्ट्रवादीचे प्रा.श्री.सुशील शेळके, श्री.सोमनाथ बोंदर, श्री.दत्तात्रय साळुंके, श्री.वैभव मुंडे, श्री.उत्तम टेकाळे, श्री.अरुण चौधरी, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
#कळंब #लोकसभा #Loksabha #Kalamb