पुतण्याला न्याय देण्यास काका कमी पडले, मुख्यमंत्र्यांकडून धनंजय सावंत यांची आश्वासनावर बोळवण*
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव लोकसभेसाठी धनंजय सावंतांना उमेदवारी मिळवून देण्यास तानाजी सावंत अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. पुतण्याला लोकसभेची उमेदवारी देण्यास काका कमी पडल्याची आता चर्चा होत आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळवून देण्यास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे कमी पडल्याचे दिसून येते. सत्तांतर घडून आणण्यासाठी जवळपास दीडशे बैठका घेतल्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जाहीर सभेत सांगितले होते. मात्र आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आपल्या पुतण्याला लोकसभेची उमेदवारी देण्यास कमी पडल्याचे दिसून येते.
तानाजी सावंतांचे समर्थक आणि धनंजय सावंत यांनी बंड केल्यानंतर हजारो समर्थकांसह मुंबई गाठली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याशिवाय परत यायचेच नाही, अशी ठाम भूमिका धनंजय सावंत आणि समर्थकांनी यांनी घेतली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात होणाऱ्या लोकसभेची तयारी करा, तसेच योग्य ठिकाणी संधी देऊ, असे आश्वासन देऊन झालेला बंड शमवण्याचा प्रयत्न केला. धनंजय सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनावर बोळवण केल्याचे चर्चा धाराशिव जिल्ह्यात होत आहे.