धाराशीवमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला, ओमराजे निंबाळकरांविरोधात अर्चना पाटील रिंगणात*
*धाराशीवमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला, ओमराजे निंबाळकरांविरोधात अर्चना पाटील रिंगणात*
धाराशीव लोकसभा मतदारसंघात मविआचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील असा सामना रंगणार आहे. अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
*धाराशीवमध्ये उमेदवार आयात का करावा लागला, सुनील तटकरे म्हणाले...*
धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी देताना काय निकष होता, असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर सुनील तटकरे यांनी म्हटले की, धाराशीवमध्ये सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांची नावं प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत होती. विक्रम काळे विधानपरिषदेत निर्वाचित होऊन एक वर्षच झालं आहे. सतीश चव्हाण यांचीही विधानपरिषेदतील तीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबात गांभीर्याने चर्चा नव्हती, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.