40 उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ,
40 उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ,
सौ.देविकाताई जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या भूम तालुका गावभेट दौऱ्यात बेदरवाडी,नान्नजवाडी,आंभी, दांडेगाव,अंतरवली,सावरगाव,उमाचीवाडी,वडाचीवाडी,नागेवाडी,मात्रेवाडी, पन्हाळवाडी,जांब आदी गावामध्ये उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला,
ओमदादा खासदार म्हणून निवडून आल्यास प्रामाणिकपणे जनतेचा ५ वर्षे काम करण्याचा विडा त्यांनी उचलला होता, तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून, अनेक जनहिताची कामे खासदार साहेबांनी करून दाखवली,त्यामध्ये प्रामुख्याने धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय,पारडी ते खर्डा राज्यमार्ग मंजूर करून तो रोड पूर्ण केला,जिल्ह्यातील विद्युत केंद्रावर अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उभा करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला,लातूर पुणे इंटरसिटी रेल्वे,शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळवून दिला,मराठा लिंगायत आरक्षणावर सातत्याने संसदेत आवाज उठवला,धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व अपंग बांधवांना मोफत उपयोगी साहित्य वाटप केले असे अनेक लोकोपयोगी कार्य खासदार साहेबांनी केले.
निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा,जनता ओम दादा च्या पाठीशी उभा राहून मशालीच्या चिन्हाला मतदान करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते महिला भगिनी व युवक बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.चेतन वसुदेव बोराडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवा सेना जिल्हाप्रमुख,धाराशिव.
(उद्धव बाळासाहेब ठाकरे)