Skip to main content

आता 31 उमेदवार निवडणूक रिंगणात उमेदवारांना चिन्हांचे वाटप 4 उमेदवारांची निवडणूकीतून माघार

आता 31 उमेदवार निवडणूक रिंगणात उमेदवारांना चिन्हांचे वाटप 4 उमेदवारांची निवडणूकीतून माघार




राहुल कोरे आळणीकर
आता 31 उमेदवार निवडणूक रिंगणात उमेदवारांना चिन्हांचे वाटप 4 उमेदवारांची निवडणूकीतून माघार

धाराशिव दि.23 (अमजद सय्यद) येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत 22 एप्रिल रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 4 उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात आता 31 उमेदवार आहेत.या 31 उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. 
          ज्या 4 उमेदवारांनी 22 एप्रिल रोजी निवडणूकीतून माघार घेतली, यामध्ये विक्रम काळे,बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर यांचा समावेश आहे.
            निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील,पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (चिन्ह-घड्याळ),ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, पक्ष-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे,(चिन्ह-मशाल),संजयकुमार भागवत वाघमारे,पक्ष-बहुजन समाज पार्टी (चिन्ह-हत्ती),आर्यनराजे किसनराव शिंदे,पक्ष-राष्ट्रीय समाज दल (आर),(चिन्ह-अंगठी), भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, पक्ष-वंचित बहुजन आघाडी (चिन्ह-प्रेशर कुकर),नेताजी नागनाथ गोरे,पक्ष- देश जनहित पार्टी (चिन्ह-शिट्टी),नवनाथ विश्वनाथ दुधाळ,पक्ष-विश्व शक्ती पार्टी (चिन्ह-काडेपेटी),नितेश शिवाजी पवार,पक्ष-हिंदराष्ट्र संघ (चिन्ह-वाळूचे घड्याळ),ॲड.विश्वजीत विजयकुमार शिंदे,पक्ष-आदर्श संग्राम पार्टी (चिन्ह-बॅट),शामराव हरीभाऊ पवार, पक्ष-समनक जनता पार्टी (चिन्ह-जहाज),शेख नौशाद इकबाल, पक्ष-स्वराज्य शक्ती सेना (चिन्ह-हिरा), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई,पक्ष-ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (चिन्ह-पतंग),ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी,पक्ष-समता पार्टी (चिन्ह-बॅटरी टॉर्च),अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष (चिन्ह-बुध्दीबळ पट),उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (चिन्ह-टेबल), काका फुलचंद कांबळे,अपक्ष (चिन्ह-मोत्यांचा हार),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (चिन्ह-भेंडी), गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (चिन्ह-चिमणी),नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (चिन्ह-ऑटोरिक्शा), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (चिन्ह-कपाट),ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (चिन्ह-भेटवस्तू), नितीन खंडू भोरे,अपक्ष (चिन्ह-गॅस सिलेंडर),मनोहर आनंदराव पाटील, अपक्ष (चिन्ह-शिवणयंत्र),योगीराज आनंता तांबे,अपक्ष (चिन्ह-तुतारी), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (चिन्ह-पेट्रोलपंप),राम हनुमंत शेंडगे, अपक्ष (चिन्ह-फुलकोबी),विलास भागवत घाडगे,अपक्ष (चिन्ह-सितार), शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (चिन्ह-रोड रोलर),समीरसिंह रमेशचंद्र साळवी-अपक्ष (चिन्ह-पाण्याची टाकी),सोमनाथ नानासाहेब कांबळे- अपक्ष (चिन्ह-किटली) व हनुमंत लक्ष्मण बोंदर,अपक्ष (चिन्ह-विजेचा खांब) या उमेदवारांचा समावेश आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक