*भुम दौर्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून विरोधकांचा समाचार घेतला.*
*भुम दौर्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून विरोधकांचा समाचार घेतला.*
धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निपाणी लांजेश्वर अंदरूड पखरूड ज्योतीबाचीवाडी नळवडगाव फाटा,तिंत्रज,जेजला, गणेगाव,अंतरगाव,या गावांचा जनसंवाद दौरा केला.या गावात भरदुपारी सुध्दा लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला.हिच माझ्या कामाची पावती आहे असा विश्वास ओमराजेंनी व्यक्त केला.विरोधक टिका करतात ओमराजे संपर्कात आहेत.तुम्ही फोन उचलता शाश्वत काम काय केली.हिच काम घेऊन मी जनसंवाद दौरा करत आहे ओमराजे यांनी सांगितले.
ज्या तानाजी सावंत यांना आमदार,मंत्री दुसर्यांदा आमदार ज्या पक्षानं केलं त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो का ? स्वतःला त्यांनी प्रश्न विचारावा आपली राजकीय ओळख नसताना ग्रामपंचायतचे सदस्य हि नव्हता आपण कसे वागलो याचं हि आत्मपरीक्षण करणं गरजेचे आहे.
आम्हाला आमच्या आईबापांनी संस्कृती शिकवली, सुसंस्कृतपणा शिकवला आहे.प्रत्येकजण आपल्या आईबापाचा आदर करतो त्या संस्कारावर आम्ही चालतो.कुणाचे संस्कार कसे आहेत कुणाच्या तोंडातून गटार गंगा वाहिली त्यांनीच त्याचा विचार करावा.मला काय बोलायची गरज नाही तुमच्या समोर जर एखादा कुत्रा भुंकत असेल तर तुम्ही भुंकत बसता का ? वाट बदलून पुढे जाता ना...अशी टिका तानाजी सावंत यांच्यावर ओमराजे यांनी केली.
महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी भरीव तरतुद तसेच रेल्वे प्रकल्पासाठीचे भुसंपादन माझ्याच कारकिर्दीत झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी विजेची सुविधा मिळावी यासाठी 1303 कोटी 70 लाखाचा निधी मंजुर केला आहे. रस्ते विकासासाठी सुध्दा हजार कोटीपर्यंत निधी आणलेला विरोधकाना दिसत नाही असा पलटवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला आहे.
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे असताना ते मंजुर करुन घेतले आहे. काही महिन्यात तिथ तिसरी बॅच देखील सुरु होईल. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी उध्दवजी मुख्यमंत्री असताना 2206 कोटी रुपयाचा भरघोस निधी दिला आहे. 1303 कोटीपैकी वितरण केले आहे. 673 कोटीतून व्यवस्थेच्या आधुनिकीकरण, 300 कोटी मधून मीटर बसवण्यात येणार आहेत. 125 कोटीतून फिडर सेपरेशन, 204 कोटी वीज चोरी रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहे. वीज वितरणाचे आधुनिकीकरण व संपूर्ण प्रणाली मजबूत करण्यासाठी 673 कोटी 83 लाख रुपयांच नियोजन केल्याचे खासदार ओमराजेनी सांगितले.
जिल्ह्यात 40 ठिकाणी पाच एम एस क्षमतेचे उपकेंद्र तसेच ज्या ठिकाणी पूर्वी उपकेंद्र आहेत अशा 38 उपकेंद्रांमध्ये पाच एमचे ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. उपकेंद्रात ट्रांसफार्मरची क्षमता पाच एम व्ही ए वरून दहा एम व्ही ए एवढी क्षमता वाढ होणार आहे. एक हजार 945 किलोमीटर उच्च दाब वाहिनीचं जाळ असुन जिल्ह्यात दोन हजार 250 ठिकाणी नवीन रोहित्र तर दिड हजार 50 डीपीची क्षमता 63 वर करण्यात आली आहे. 78 ठिकाणी कॅपॅसिटर बँक, 49 किलोमीटर आवरण असलेली तार बसविण्यात आली. जिल्ह्यात एकशे तेरा ठिकाणी फिडरचे विलगीकरणासाठ 125 कोटी रुपयाची तरतुद केल्याचे राजेनिंबाळकर यांनी सांगितले. रस्ते विकासाचा विचार केला तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २७ कामासाठी 134 कोटी निधी आणला तर पंतप्रधान सडक योजनेंतर्गत 133 किलोमीटर चे रस्ते करणेसाठी 89 कोटीचा निधी मंजुर केला आहे. तसेच तुळजापुर- नळदुर्ग रस्त्याचे 10 मीटर रुंदीकरणासाठी 183 कोटी निधी मंजुर केला असुन त्याची निविदा प्रक्रीया देखील सुरु झाली आहे. नळदुर्ग- अक्कलकोट मार्गाचे काम चालु असुन त्यावर 274 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
आयोजित गाव भेट दौऱ्यात केला ही सर्व कामे माझ्या प्रयत्नाने झाली असुन जनतेला ते माहित आहे. अडल्यानडल्या जनतेची फोनवरुन होणारी किरकोळात किरकोळ किंवा अगदीच गंभीर काम झाली असतील तर विरोधकांच्या पोटात गोळा येण्याच कारण काय असा सवालही राजेनिंबाळकर यांनी केला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख रणजित पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे, भुम तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर,माजी तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, रवि कोरे आळणीकर,उपतालुकाप्रमुख श्रीमंत भडके,उपतालुकाप्रमुख अशोक वनवे, उपतालुकाप्रमुख राजाभाऊ नलावडे, युवासेना शहरप्रमुख विकास चव्हाण,विधानसभा चिटणीस माऊली शाळू,युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद अडागळे, युवासेना तालुका समन्वयक प्रतिक रणदिवे,शोशल मिडीया संग्राम लोखंडे,उपस्थित होते..!