उमेदवारीसाठी १० कोटीचा चेक दिला.. बापाची माया दिली, तरीही पक्ष बदलला|| मंत्री सावंत यांचा खा. ओमराजेवर घणाघाती टिकेने हल्लाबोल || ठाकरे यांनाही घेतले फैलावर
उमेदवारीसाठी १० कोटीचा चेक दिला.. बापाची माया दिली, तरीही पक्ष बदलला
|| मंत्री सावंत यांचा खा. ओमराजेवर घणाघाती टिकेने हल्लाबोल || ठाकरे यांनाही घेतले फैलावर; टिकने प्रतिउत्तर !
परंडा: ज्या तानाजी सावंत यांनी ठाकरे यांच्या पक्षाला १० कोटीच्या निधीचा चेक देवून यांचे तिकीट आणले, कोटीचा खर्च करून निवडून आणले, बापाची माया दिली आणि निवडूण आल्यानंतर यांनी पक्ष बदलला, असे कसे चालते? अशी घणाघाती टिका करून राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंवाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच केंद्रातल्या हजारो योजनापैकी एक योजना आणलेली दाखवा असे आव्हान खा. ओमराजे बांना दिले. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी कृष्णा मराठवाड़ा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना जेऊर बोगदा शाफ्ट क्र. १ दहिगाव (ता.करमाळा, जि. सोलापूर) व मिरगव्हाण बंगाळवाडी (ता. परंडा जि. धाराशिव) या कामांची रविवारी (दि.१०) पाहणी करून सभेस संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. सभेस जि. प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना
जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सुरज सांळखे
होती, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे काम बंद पडले होते. ते मी चालू केले. उजनी - मिरगव्हाण बोगद्याला प्राधान्य दिले. महापूराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मिरगव्हाण बंगाळवाडी प्रकल्पात आणून त्यानंतर सिना कोळेगावात सोडण्यासाठी ११ हजार ५०० कोटीचा निधी मी मंजूर करून घेतला, आज ६०० मीटर बोगदा कामाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे नविन ३ लाख एकर क्षेत्र ओलीताखाली येऊन हजारो शेतकरी बागायतदार होणार आहेत. में ते जून मध्ये सबस्टेशन होऊन वीज प्रश्नही मागी लागेल, डिसेंबर २०२४ पर्यंत पाणी येणारच व ४० वर्षाची या भागातील जनतेची वणवण थांबणार आहे, यामुळे आकांक्षीत जिल्हा म्हणून ओळख असलेला धाराशिव जिल्ह्याचा कलंक पुसनार आहे, असा दावा पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केला. यापूर्वी केवळ खोटी आश्वासने मागील सरकार व नेत्यांनी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
■ तर समोर उपस्थित जनसमुदाय.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाच्या पाहणीनंतर मिरगव्हाण बंगाळवाडी येथे जाहीर सभेस संबोधित करताना शिवसेना
साळुंके, डिसीसी बैंक संचालक अॅड. केशव सावंत, किरण सावंत, माजी जिल्हाप्रमुख गौतम लटके, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, जि.प. माजी सभापती दत्ता मोहिते, तहसीलदार घनश्याम आडसूळ, तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, संघटक जयदेव गोफणे, युवा
मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली
सेना तालुकाध्यक्ष राहूल डोके धनंजय पाटील, परंडा प. स. माजी सभापती सतीश दैन, भूम बाजार समिती सभापती निलेश शेळवणे शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, बालाजी नेटके, हभप नागेश मांजरे, विशाल देवकर, माऊली गोडगे, आप्पा कारंडे, सतीश मेहेर, दत्ता रणभोर, रत्रकांत शिंदे, विजयकुमार बनसोडे, मनोज कोळगे, मतीन
जिनेरी, अॅड. दत्तात्रय सुर्यवंशी, वैभव पवार, समीर पठाण, समाधान सातव, विशाल ढगे, बालाजी गुंजाळ, युवराज तांबे, अजित पवार, निलेश चव्हाण, रामकिसन गव्हाणे, दत्ता गायकवाड, ज्ञानेश्वर गिते, उमेश नयकिदे, खंडू गोयकर, मधुकर अर्जुन आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, यापूर्वीच्या राज्यकत्यांनी
शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी केलेल्या अयोग्य मंत्र्याच्या टिकेला पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जहरी टीका करून प्रतिउत्तर दिले. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांचे शिक्षण किती झाले हे तपासावे? मी उच्च शिक्षीत आहे. डॉक्टरेट घासून व ठासून घेतली आहे. आज मी ३० हजार लोकांना रोजगार देतोय. जनतेने तुम्हाला एवढे आमदार देवून चूक केली. ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला फक्त पानं पुसायचे काम केल. जनतेच्या प्रश्नांचे यांना देणंघेणं नाही, यांनी फक्त जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत, असे म्हणत पालकमंत्री डॉ. सावंत यांनी श्री. ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली.
कृष्णा मराठवाडा प्रकल्पास मान्यता दिली परंतू ४० वर्ष प्रकल्प रखडवत ठेवून आजपर्यंत या मुद्यावर निवडणूक लढवून राजकारण केले. या भागातील जनतेला पाण्यापासून बंचित ठेवले. वात्कालीन सरकारने २०१२ पर्यंत आवश्यक असलेल्या विविध खात्यांची परवानगीच घेतली नाही. केंद्रासह पर्यावरण व पाणी वाटप लवादाची परवानगी घेतली
डॉ. सावंत मंत्री झाल्यापासून या कामास गती मिळाली. डॉ. सावंत हे विकास कामे करणारे नेतृत्व असून त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच परंडा विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं, मोठी विकास कामे मिळाली, भरघोस निधी आणला. विकासाचे नेतृत्व कस असावं हे सावंत यांनी दाखवून दिलंय. या पाण्याने सर्व प्रकल्प भरणार असून ही सावंत यांची कृपा आहे, असे प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांनी केले.
नाही. आजपर्यंत केवळ निवडणुकात या मुद्यांचा वापर केला. ७ टीएमसी पाणी कृष्णा निरा उजनी या माध्यमातून उजनी ते सिना कोळेगाव पाणी आणायचे तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ११ घरणे पाईपलाईनने जोडून मराठवाड्याला पिण्याचे पाणी द्यायचे, अशी संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
माजी आ. पाटील, मोटेंवर टिकास्त्र
ज्याला आजारात साथ दिली तो मला हद्दपार काय करणार? अशी टीका माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केली. केवळ राजकारणासाठी माजी आ. राहूल मोटे यांनी १२ वर्ष काम रखडून ठेवल्याचा आरोपही पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केला.