*16 वर्षा खालील मुलांच्या जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी*



*16 वर्षा खालील मुलांच्या  जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी*

महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट संघ निवड पूर्व आंतर  जिल्हा आमंत्रित  क्रिकेट स्पर्धा करिता 16 वर्षा खालील मुलांच्या जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोशीएशन यांचे वतीने करण्यात आले आहे .
16 वर्षा खालील मुलांच्या निवड चाचणी करिता जन्मतारीख. 1/9/2008 पुढे असावी,हि निवड चाचणी. दि.31/03/2024रोजी सकाळी. 10 वाजता सहारा क्रिकेट ग्राउंड शिराळा (येरमाळा -बार्शी रोड )येथे होणार आहे. निवड चाचणी साठी येताना आधार कार्ड व जन्मतारखेचा पुरावा सोबत आणावा. निवड चाचणी शुल्क  रु -500/- व खेळाडूंनी  स्वतः क्रिकेट किट आणावे. 
जास्तीत जास्त क्रिकेट 
खेळणाऱ्या  मुलांनी या निवड चाचणीत सहभाग घ्यवा. जे खेळाडू बोन टेस्ट मध्ये फेल झाले आहेत अश्या खेळाडूंनी या निवडचाचणीत भाग घेऊ नये .
असे आवाहन असोशिएशन चे अध्यक्ष विजय दंडनाईक व सचिव दत्त्ता बंडगर यांनी  केले आहे.
निवड चाचणी संदर्भात अधिक माहिती साठी 
रियाज शेख मो नं :-9284538703
युवराज पवार मो नं:-9921897965 
यांच्याशी संपर्क साधावा.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक