मी खुप कामाची अस म्हणणार्याा नव्या नवरीसारखा राणा पाटलाचा धडपडा- खासदार ओमराजेंनी केला शेलक्या शब्दात वार

धाराशिव ता. २४: जशी नवी नवरी मी खुप कामाची आहे हे दाखवण्यासाठी केलेल्याच कामाचा पाडा वाचते तशीच धडपड राणा पाटील करत असल्याची टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
शहरातील सर्व्हिस रोडसाठी मंजुर ६८ कोटीच्या कामाचे नागरीकांच्या हस्ते केलेल्या भुमीपुजन कार्यक्रमा ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, जेष्ट नेते नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, बाजार समीतीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर,सतिष सोमानी, पंकज पाटील, उपळ्याचे सरपंच सुरज घोगरे, मनोज पडवळ आदीसह या भागातील नागरीकांची उपस्थिती होती. डी मार्टनजीक सर्व्हिस रोड तसेच एक अंडरपास होण्यासाठी या भागातील जनतेची मागणी होती. या मागणीसाठी गेल्या पाच वर्षापासून शिवसेनेच्या नेत्यांनी पाठपुरावा केला मात्र भुमिपुजनाचा सोहळा सत्ताधार्यांतनी उरकुन घेतला. यामुळं ज्यांनी यासाठी योगदान दिले अशा सर्वच लोकासह खासदार,आमदार व माजी नगराध्यक्ष यांचा यावेळी सत्कार केला. शिवाय स्थानिक नागरीकाच्या हस्ते त्याचे भुमिपुजन केले. ओमराजे म्हणाले की, या महामार्गावर सर्व्हिस रोडसह अंडर पास नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते, शिवाय रहदारीस अडथळा येत होता. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आपण दिशा समीतीमध्ये, रस्ता सुरक्षा समीतीच्या बैठकीमध्ये तसेच स्वत: सबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. पण ज्यांनी याबाबत काहीच केले नाही त्यांनी निधी मंजुर झाल्यानंतर भुमिपुजनाच्या कार्यक्रम घेऊन पक्षीय प्रचार केला. श्रेय घ्यावच वाटत असेल तर तुमच्या परिवारांन जिल्ह्याच वाटोळ केल त्याच घ्या. आजवर तुम्ही किती प्रकल्प योजना कागदावर आखल्या व प्रत्यक्षात त्याचे काय झाले याचेही श्रेय घ्यावे असा टोला खासदार राजेनिंबाळकर यांनी लगावला. शिंगोलीच्या परिसरात एका कारखान्याची चिमणी अनेक वर्षापासून दिसते त्यावर माहिती घेतली तर त्यांच्यामते चिमणी सगळीकडुन दिसते, लोकांना वाटत की काम सुरु आहे. म्हणजे फक्त काम होणार अस दाखवत जनतेची फक्त फसवणुक करणारी ही मंडळी असल्याचे खासदारांनी म्हटल. आमदार कैलास पाटील म्हणाले की, शासकीय कार्यक्रमातही आता पक्षाचे झेंडे, बॅनरबाजी करुन जनतेच्या पैशाची लुट केली जात आहे. यापुढेही या कामाबाबत काही अडचण असल्यास आम्ही ते पुर्ण करु असे आश्वासन यावेळी आमदार पाटील यानी दिले. मकरंद राजेनिंबाळकर यांनी आपल्या खास शैलीत आमदार राणा पाटील यांच्याविरुध्द टिका केली. स्वत:च्या तत्कालीन मतदारसंघातील प्रश्न सोडवता आला नाही. पण प्रश्न सुटल्यावर श्रेय घेण्याची त्यांची धडपड हास्यास्पद नव्हे तर लज्जास्पद असल्याचे त्यानी म्हटले. जेष्ट नेते नानासाहेब पाटील यांनीही हे कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार्याअ खासदार,आमदार व माजी नगराध्यक्ष या तिघांचे अभिनंदन केले.
सोमनाथ गुरव यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन दौलत निपाणीक