आदरणीय राणादादा, तुम्ही माझ्या अत्यंत कठीण समयी मदतीला धावून आलात. माझ्यासाठी तर तुम्ही देवदूत ठरलात !!*
*आदरणीय राणादादा, तुम्ही माझ्या अत्यंत कठीण समयी मदतीला धावून आलात. माझ्यासाठी तर तुम्ही देवदूत ठरलात !!*
दादा, आपल्या विषयी किती लिहावे आणि कोणत्या शब्दात लिहावे सुचत नाही. आपले इतके महान कार्य आहे की, माझ्याकडील शब्दही अपुरे पडतील. थोडंसं सविस्तर लिहितोय.
साधारणतः सन 2009 पासून मी आपला कार्यकर्ता आहे.डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब आपण व आपला परिवार याविषयी मला लहानणापासूनच आकर्षण राहिलेले आहे. त्यानंतर कॉलेज करत असताना सध्याचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांची ओळख झाली.त्यांच्या माध्यमातून अनेकवेळा आपल्या सहवासात येण्याचा योग आला त्यानंतर विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून आपल्याशी जवळीकता वाढत गेली. अनेकांच्या विविध अडचणी घेवून मी आपल्याकडे येवू लागलो,लोकांच्या अडचणीही मार्गी लागू लागल्या त्यामुळे समाजामध्ये अल्पावधीतच माझी राणा दादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली.घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम परंतु समाजसेवेचा खूप छंद असल्याने हा नित्यक्रम झाला.
हाताला काही काम नव्हतं म्हणून माशाचा व्यवसाय सुरू केला व उपजीविका भागू लागली.कालांतराने आपण मला आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी दिली त्यामाध्यमातून पी.एम.स्वनिधी,मुद्रा योजना, पी.एम.मत्स्य संपदा योजना अशा विविध योजनांच्या अंतर्गत हजारो युवक,महिला उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
सर्व काही सुरळीत चालू होते दुर्दैवाने मला किडनी चा गंभीर आजार जडला घरचे सगळे घाबरून गेले.पहिला उपचार आपल्या तेरणा हॉस्पिटल नेरूळ येथे घेतला परंतु काही दिवसातच माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्रास खूप वाढला चालताना धाप लागणे,झोप न येणे,जेवण न जाणे,श्वास न घेता येणे अशा अनेक आरोग्य विषयक अडचणी वाढू लागल्या.अशावेळी कुठे जावे आणि काय करावे हे घरातील कोणालाच समजत नव्हते सर्वजण घाबरून गेले होते.मी आपल्याशी संपर्क साधला तेरणा हॉस्पिटल नेरूळ येथे ऍडमिट झालो.तेथील तज्ञ डॉक्टरांमुळे तीन दिवसात ठणठणीत झालो.तेरणा हॉस्पीटल चा स्टाफ ही खूप चांगला व काळजी घेणारा आहे. तात्पुरता ठणठणीत झालो परंतु डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्याचा सल्ला दिला.घरच्या बरोबर चर्चा झाली व माझी आई लगेच किडनी देण्यासाठी तयार झाली.
*ऑपरेशन चा खर्च 8 ते 10 लाख येईल असे सांगितले.हा खर्च मात्र माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या अवाक्या बाहेरचा होता.पुढील उपचार अपोलो हॉस्पिटल बेलापूर नवी मुंबई येथे चालू झाला.गावाकडून ये जा करणे शक्य नसल्याने नेरूळ सेक्टर 10 येथे रूम केला व सर्व कुटुंब मुंबईला आले.किडनी ची सोय झाली होती पण पैशाची खूप मोठी अडचण होती.अशा वाईट काळात अनेक जवळच्या मित्रानीही शक्य होईल तितकी मदत केली पण आकडा खूप मोठा होता जुळवाजुळव करणे शक्य होत नव्हते.मी ऍडमिट झालेल्या दिवसांपासून दर दोन दिवसाला सातत्याने दादा आपण आपुलकीने चौकशी केली.अगदी पोटच्या लेकराप्रमाने आपण आपुलकीने विचारपूस करत होतात.आपण जिल्ह्याचे नेते आहात लाखो लोकांचा भार आपल्यावर असताना देखील माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात पाठीशी ठामपणे उभे राहिलात.ऑपरेशन साठी किती पैसे कमी आहेत विचारणा करून लागलीच 3 लाख रुपये आपण पाठवून दिले.दादा आपले अनंत कोटी उपकार माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आहेत.मी व माझा परिवार आपल्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नाही.मला सार्थ अभिमान आहे मी आपल्या सारख्या महान नेत्याचा कार्यकर्ता असल्याचा.*
*धन्यवाद दादा 🙏🏻*
आपला
सचिन बालाजी लोंढे
9922082626