हातलाई शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचे शुभारंंभ

हातलाई शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचे शुभारंंभ

हातलाई शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचे थाटात शुभारंभ
धाराशिव : कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळी पूजन सोहळा ३९४ व्या शिवजन्मोत्सव निमित्त युगांडा देशाच्या व्यापार सहकारमंत्री नतबाजी हेरियट व कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी. मोहनराव व अजिंठा फार्मा लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , युवा उद्योजक तथा हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .
     प्रथम मान्यवरांच्या हस्ते पहिल्या गळित हंगामाचे मोळी पूजन करण्यात आले तर त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हातलाई शुगर च्या निर्मिती पासून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाचा तर युगांडा सोबत निर्यातीच्या करारातून या क्षेत्राला होणारा फायदा या बाबीवर त्यांनी प्रकाश टाकला .
   तर युगांडाच्या सहकारमंत्री नतबा हेरियट यांनी आपल्या भाषणातून हातलाई शुगरच्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ तर होईलच पण त्यासोबत रोजगारची संधी या भागातील तरुणांना उपलब्ध होईल , आमच्या देशाबरोबर झालेल्या निर्यातीमुळे या क्षेत्राला ऊर्जितवस्था प्राप्त होईल असे मत त्यांनी व्यक्त करीत आमच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहनही या निमित्ताने केले.
     हातलाई शुगरचे चेअरमन युवा उद्योजक अभिराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मांडताना कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर व शेतकऱ्यांचे विशेष आभार मानत फक्त शेतकऱ्यांचे हित सांभाळणारा कारखाना अशी ओळख निर्माण करेल , अशी ग्वाही या निमित्ताने त्यांनी दिली .
      या वेळी श्री तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील , रुपामाता उदयोगाचे प्रमुख ॲड .व्यंकटराव गुंड , सिद्धीविनायक उद्योग समूहाचे प्रमुख दत्ता कुलकर्णी , तुळजाई उदयोग समूहाचे प्रमुख अनिल काळे , मोहेकर उदयोग समूहाचे प्रमुख हणुमंत मडके ,मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख , दिंगबर मळेकर , अनिल कांदे पाटील , जयसिंह नाना देशमुख , सतीश दंडनाईक , ॲड .सुधाकर गुंड , दगडू धावारे , अनिकेत मोळवणे , गुणवंत पवार , विजय देशमुख, रामभाऊ बांगर , डॉ. राहुल पाटील , पियुष मळेकर , किशोर सावंत , शितल गायकवाड , राजेंद्र नहाणे , महेश आव्हाड , धनजंय शिंगाडे , संजय दुधगावकर , रवी दुधगावकर , किशोर सावंत , आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , संस्था सदस्य आदित्य पाटील , डॉ.मंजुळाताई पाटील व कळंब तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी , राजकीय व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक