आता पुन्हा शिवगर्जना महानाट्याच्या तारखेत बदल**श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा* *संकुल येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान महानाट्य*


                                                                    
 *आता पुन्हा शिवगर्जना महानाट्याच्या तारखेत बदल*

*श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा* *संकुल येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान महानाट्य*

धाराशिव दि.१३ (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्तवतीने आता पुन्हा सुधारित तारखेला म्हणजे १८ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित " *शिवगर्जना* " या महानाट्याचे आयोजन आता श्री. तुळजापूर भवानी जिल्हा क्रीडा संकुल, धाराशिव येथे सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.     
    
 " *शिवगर्जना* " महानाट्याच्या आयोजनाच्या तारखा यापूर्वी १९ ते २१ फेब्रुवारी २०२४ अशा निश्चित करण्यात आल्या होत्या.आता १८ फेब्रुवारीपासून महानाट्याची सुरुवात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.

        "*शिवगर्जना* " महानाट्याची प्रेक्षक क्षमता  ८ ते १० हजार इतकी आहे.फिरता ६५ फुटी भव्य रंगमंचावर ३०० कलावंत हे महानाट्य सादर करणार आहे.यामध्ये हत्ती,घोडे,उंट व बैलगाडी देखील असणार आहे.या महानाट्यामध्ये चित्तथरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग,एक धगधगत्या इतिहासाची आठवण,नेत्र सुखद अतीषबाजी,खराखुरा निखळ इतिहास,मंत्रमुग्ध संगीत,नेत्रदीपक प्रकाश योजना,आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड घातलेली पाहायला मिळणार आहे.
       
 या महानाट्यमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण,विजयनगरचे साम्राज्य,लखोजी राजाची हत्या, शिवजन्म,युद्ध कला व राज्यकारभार प्रशिक्षण,स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध,पन्हाळगड वेढा,पावनखिंडीतील शौर्यगाथा, शाहिस्तेखानाची फजिती,सुरत लूट,कोकण मोहीम,पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य,आग्रा भेट,तानाजी मालुसरेचे बलिदान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हे प्रसंग या महानाट्यातून बघायला मिळणार आहे.तरी प्रेक्षकांनी  महानाट्याच्या पुन्हा बदल झालेल्या तारखांची नोंद घ्यावी.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक