मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भुम येथे धडाडनार तोफ

   मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची  धाराशिव लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा

 

औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भुम येथे धडाडनार  तोफ

 

              महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब हे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते पाच ठिकाणी जाहिर सभाव्दारे जनतेस संवाद साधणार आहे या जनसंवाद यात्रेचा दौरा खालील प्रमाणे आहे.

            मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब हे  दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12  वाजता पोहोचणार असून त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालय, तुळजापूर मोड येथे  सभा घेणार आहेत व त्यानंतर लामजनाकिल्लारी मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत दिनांक 16  फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता उमरगा येथे दत्त मंदिर समोर गुंजोटी कॉर्नर येथे  सभा होणार आहे  यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक , तुळजापुर येथे  सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर शिंगोली व्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे

             त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 17  फेब्रुवारी रोजी शिंगोली व्ही.आय.पी. गेस्ट हाऊस येथून आळणी फाटाढोकी मार्गे कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील  होळकर चौक येथे 11 वाजता सभा आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून  सोनारी कडे प्रवास करणार असून सोनारी येथे भैरवनाथचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर अनाळा ,वालवड मार्गे  भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे 5  वाजता ओंकार चौक नगर पालीकच्या समोर सभा आहे व सभा  संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणर आहेत. अशा प्रकारचा दौरा आहे तरी आपण सदरील बातमी आपल्या दैनिकातून प्रसिद्ध करावी     

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक