जि.प.धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जि.प.प्राथ,शाळा आळणीस भेट.*

*जि.प.धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जि.प.प्राथ,शाळा आळणीस भेट.* 
आज दुपारी ठीक दीड वाजता जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मैनाक घोष साहेब यांनी भेट देऊन रिड उस्मानाबाद या उपक्रमाबाबत आढावा घेतला. उपक्रमाबाबत शाळेत होत असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजीत प्रश्न विचारले. इंग्रजी वाक्याचे मराठी मध्ये भाषांतर  विचारले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय खेळीमेळी मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली. गुणवत्ता पाहून साहेबांनी मुलांचे कौतुक केले. इंग्रजी विषयाबाबत  सन्माननीय श्री मुख्य कार्यकारी अधिकारी श्री घोष साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी इंग्रजी मधून संभाषण साधून विद्यार्थ्यांचे कौतुक शिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब, श्री फाटक साहेब यांनी केले.
शाळेतील मुलांना रिड उस्मानाबाद अंतर्गत एनजीओकडून पुस्तके श्री घोष साहेब यांच्या हस्ते भेट देण्यात आली.यावेळी त्यांच्यासोबत रीड उस्मानाबादचे जिल्हा समन्वयक साहेब श्री पाटणकर साहेब शिक्षणाधिकारी ( प्राथ.) श्री अशोक पाटील साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री फाटक साहेब, केंद्र प्रमुख श्री नागले साहेब उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक