जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचा कार्य अहवाल मुंबई पक्ष कार्यालयात सादर...
जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचा कार्य अहवाल मुंबई पक्ष कार्यालयात सादर...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी (दि.13) मुंबई येथे पक्ष कार्यालयास भेट दिली. मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी भेटून आपल्या कार्याचा कार्यअहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.शिवाजीराव गर्जे साहेब यांच्याकडे सादर केला.
मागील काळामध्ये जिल्ह्यातील झालेल्या पक्षाच्या संबंधित विविध कामे, पक्षप्रवेश,शाखा उद्घाटन, जिल्ह्यातील पक्षाची वाटचाल, जिल्ह्यामधील पक्ष बांधणी व संघटन या सर्व बाबींचा या अहवालामध्ये उल्लेख केलेला आहे. सध्या जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश चालू आहेत.
यावेळी मुंबई येथील कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या सोबत भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप उपस्थित होते.