४०वर्षे अंथरुणावर पडून तो एका जाग्यावर जगतोय. बाप थकलेला आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकते.

४०वर्षे अंथरुणावर पडून तो एका जाग्यावर जगतोय.

 बाप थकलेला आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकते.
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील विनोद कागदे नावाचा तरूण युवक गेल्या ४० वर्षांपासून अंथरुणावर पडून आहे.त्याला जन्मताच अपंगत्व आले आहे.दोन्ही हात पाय निकामी आहेत.कसलीही हालचाल होत नाही.आई अविदा कागदे मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकते.तर वडील शिवाजी कागदे वय ७७ वर्षं वय झाल्यामुळे ते काम करू शकत नाहीत घरी बसून मुलाची सेवा करतात.
शिवाजी निवृत्ती कागदे हे दहिफळ येथील रहिवासी मुळ गाव गोलेगाव अनेक वर्षांपासून ते वास्तव्यास आहेत.त्यांना दोन मुली एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत.म्हातारपणाचा आधार , वंशाचा दिवा म्हणून एक तरी मुलगा असावा असे प्रत्येकाला वाटते.कागदे यांना दोन मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला.त्याचे नाव विनोद आहे.तो जन्मताच अपंग आहे.मुलगा मोठा झाला.परंतु तो स्वतः च्या पायाने चालू शकत नव्हता.मुलाच्या पायाचे ऑपरेशन केले परंतु काय फायदा झाला नाही.प्लास्टरमुळे नसा दबल्या व जास्तच पाय खराब झाले.हालचाल बंद झाली.आज तो चाळीस वर्षाचा मुलगा आहे.वडील ७६ वर्षाचे आहेत ते काम करू शकत नाहीत.म्हातारपणी मुलाने आई बापाची सेवा करायची असते.परंतु आज समाजात वेगळे चित्र पाहायला मिळते.म्हाताऱ्या आई वडीलांना मुलं सांभाळत नाहीत.मुलांना मोठं करण्यासाठी आई वडील किती काबाडकष्ट करतात.हाडाचं काडं करतात.ज्यावेळेस खरी गरज मुलांची असते तेव्हा मुलं आई वडिलांना वेगळं ठेवतात.श्रावणबाळाची कथा आपण ऐकतो वाचतो परंतु आचरणात आणू शकत नाही.
उलट श्रावण बाळ योजना सुरू करून आई वडील जगतात.एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे मुलगा अपंग आहे.त्याची सेवा करताना हे वयस्कर व्यक्तींचा संघर्ष सुरू आहे.अविधा शिवाजी कागदे रोज मोलमजुरी करून आपले कुटुंब सांभाळते.महागाई वाढलेली आहे.दवाखान्याचा खर्च, संसारात लागणाऱ्या वस्तू, मोलमजुरी करून संसाराचा गाडा कसा हाकायचा.शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात.परंतू त्या आमच्या पर्यंत पोहोचली नाही.मुलगा गेल्या ४० वर्षांपासून अंथरुणावर पडून आहे.आज आम्ही आहोत मोलमजुरी करून मी त्याला सांभाळते.आम्ही थकलो तर पुढे कोण सांभाळ करील.
सरकारी पगार चालु व्हावी हीच इच्छा आहे.

मी आज सहज गावात जात असताना विनोदला भेटायचं म्हणून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात गेलो.लय दिवसापासून त्याला भेटावं असं वाटत होतं विनोदची आई दारात भांडी घासत होती.विनु काय करतोय म्हणत दरवाजा पर्यंत गेलो.समोर विनोद त्याचे वडील दिसले.बोलत बोलत त्याचे फोटो घेतले.त्याला शासनाची काही पगार भेटते का? म्हणून विचारले.कुठल्या योजनेतून भेटते हे त्यांना माहीत नाही.
एका हजार रुपयात काय होतंय.तसं विनोद बोलता झाला.एवढंच येतंय.तो चालु शकत नाही.स्वत: अंघोळ करू शकत नाही,कपडे घालू शकत नाही.तो जेऊ शकत नाही.शौचालयास जाऊ शकत नाही.सगळ त्याची आई करते.आई कामाला गेली तर वडील सगळ करतात.
माणसाचा जन्म कसा आहे.धडधाकट शरीर असलं तर बरंय नाहीतर दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते.खरच विनोदच्या आई वडीलांना मानायला पाहिजे.गेल्या चाळीस वर्षांपासून मुलगा अंथरुणावर पडून आहे.त्याला एका जाग्यावर चाळीस वर्षे सांभाळत आहेत.
-योगराज पांचाळ दहिफळकर ✍️✍️✍️✍️
मो-७७४१०६७९७३

दानशूर व्यक्तींनी काही मदत करता आली तर बघा 👇👇

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक