जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दारफळ ता. धाराशिव येथे आरोग्य शिबीरात 560 रुग्णांची तपासणी व उपचार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दारफळ ता. धाराशिव येथे आरोग्य शिबीरात 560 रुग्णांची तपासणी व उपचार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दारफळ ता. जि.धाराशिव येथे दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दारफळ ता.जि.धाराशिव येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 560 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 100 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे राजकुमार पाटील, धर्मराज जाधव, महादेव घुटे, किशोर घुटे, हनुमंत कदम, जयराम भोरे, अनिल जाधव, राजकुमार भोरे, प्रमोद पाटील, अच्युत घुटे, बाळासाहेब घुटे, अमित सुतार, गोवर्धन सुतार इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळेडॉभावी बोरीच्या, डॉ. मुर्तुजा भोरा, डॉ.फाईम अहेमद, डॉ. बेटसी, डॉ. स्नेहल शिंदे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा आमिन सय्यद, केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, संदिप खोचरे समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत दारफळ उपकेंद्राचे डॉ. प्रसन्नजित गायकवाड व श्री. शिवाजी  पसलवाड यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक