आरोग्य हा सर्वसामान्य माणसाचा मूलभूत अधिकार* पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत *वालवड येथे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन*

*आरोग्य हा सर्वसामान्य माणसाचा मूलभूत अधिकार*
        पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत 

 *वालवड येथे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन*
धाराशिव दि.9 (जिमाका) ग्रामीण भागात चांगली आरोग्य सुविधा मिळावी हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो.त्यामुळेच आरोग्य हा सर्वसामान्य नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले. 
आज 9 जानेवारी रोजी भूम तालुक्यातील वालवड येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास,भूमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,तहसीलदार सचिन खाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल शिनगारे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रोहन बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत पुढे म्हणाले, या रुग्णालयाच्या भूमिपूजनामुळे भविष्यात इमारत उभी राहिल्यावर नागरिकांना हक्काचे रुग्णालय मिळणार आहे.या रुग्णालयात सर्व अत्यावश्यक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध केल्या  जाणार आहे.असे ते म्हणाले.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,  येत्या सहा सात महिन्यात या रुग्णालयाचे काम पूर्ण होईल.15 ऑगस्ट 2024 रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. रुग्णालयात सर्व प्रकारच्या त्या आवश्यक सुविधा,चाचण्या व उपचार केले जातील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी मोहीम राबविण्याची सूचना केली आहे.या अनुषंगाने राज्यातील 2 हजार 146  शासकीय रुग्णालयास सर्व आवश्यक सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे.गोरगरीब नागरिक,शेतकरी बांधव व कष्टकरी बांधव यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने काम करत असल्याचेही प्रा.डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
             
यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी उपस्थित आशा सेविकांना संबोधित करून त्यांच्या मागण्या संदर्भात शासन सकारात्मक असल्याचे सांगत उपस्थित अंगणवाडी सेविकांना शासन आणि जनतेला वेठीस न धरण्याचे आणि कामावर रुजू होऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले. 

या भूमिपूजन सोहळ्यात वालवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक