फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने शौर्य विजय स्तंभास अभिवादन..*

*फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने शौर्य विजय स्तंभास अभिवादन..*
धाराशिव :- लढाई होती ती समतेची,अस्मितेची,माणुस म्हणुन जगण्याची, म्हणून ५०० शुर महारांनी सन १८१८ ला २८००० पेशवाईच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला व विजयी झाले त्याचे स्मरण म्हणून भीमा कोरेगाव येथील शौर्य विजय स्तंभास २०६ व्या शौर्य दिनानिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन पेढे वाटप करण्यात आले.यावेळी शिलाताई चंदनशिवे,सौ.कांबळे,माजी नगरसेवक राणा बनसोडे,धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,बापु कुचेकर,गणेश रानबा वाघमारे संजय गजधने,प्रविण जगताप,बलभीम कांबळे, रमेश कांबळे, दादासाहेब जेटीथोर,मेसा जानराव,राजेंद्र धावारे,आनंद भालेराव,सिद्राम वाघमारे,राजाराम बनसोडे, मुकेश मोटे, उदयराज बनसोडे,बाबा कांबळे,रणजीत कांबळे लहान मुलांसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक