*मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्याच्या सर्वेक्षणास सुरुवात**सर्वेक्षण कालावधीत नागरीकांनी प्रगणकांना माहिती देण्यास सहकार्य करावे**जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे*
*मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्याच्या सर्वेक्षणास सुरुवात*
*सर्वेक्षण कालावधीत नागरीकांनी प्रगणकांना माहिती देण्यास सहकार्य करावे*
*जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे*
धाराशिव, दि. 23 (जिमाका) राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जिल्हयातील सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार,नायब तहसीलदार व मास्ट्रर ट्रेनर अधिका-यांचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजास आजपासून जिल्ह्यात सुरूवात झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज 23 जानेवारी रोजी "मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण " अनुषंगाने धाराशिव शहरातील तांबरी आणि तालुक्यातील सांजा या ग्रामपंचायत भागात भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रवीण पांडे, मुख्याधिकारी वसुधा फड,पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते.
या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी माहिती देण्याकरीता प्रगणकांना सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.हे सर्वेक्षण गोखले इन्स्टिटयुट,पुणे या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या युजर फ्रेंडली मोबाईल एप्लीकेशन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तालुकानिहाय प्रगणक व पर्यवेक्षकांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.धाराशिव - नियुक्त प्रगणकांची संख्या -732,नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -37. तुळजापूर - नियुक्त प्रगणकांची संख्या -502,नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -17.
उमरगा - नियुक्त प्रगणकांची संख्या -442, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -22.लोहारा - नियुक्त प्रगणकांची संख्या -188,नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -12.भूम - नियुक्त प्रगणकांची संख्या -266,नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -15.
परंडा - नियुक्त प्रगणकांची संख्या -280, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -14. वाशी - नियुक्त प्रगणकांची संख्या -188,नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -6 आणि कळंब नियुक्त प्रगणकांची संख्या -416, नियुक्त पर्यवेक्षकांची संख्या -14 अशी आहे.
जिल्हाधिकारी.डॉ.ओंबासे यांच्याकडून 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना सर्व नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
********