विधानसभेसाठी मलाही संधी मिळू शकते : शंकरराव बोरकर

विधानसभेसाठी मलाही संधी मिळू शकते : शंकरराव बोरकर
भूम : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २०२४ विधानसभेला निष्ठावंत कार्यकर्ते व एकनिष्ठ राहणाऱ्यांचाच विचार करतील, असा आत्मविश्वास असून येणाऱ्या विधानसभेला पक्षाकडून मला- ही संधी मिळू शकते, असे मत शिवसेना धाराशिव सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी भूम येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

भूम येथील शिवसेना (ठाक रे) महिला जिल्हा संघटकपदी झीनत कोहिनूर सय्यद यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यासाठी भूम येथे शंकर राव बोरकर आले होते. त्यांच्याशी पत्रकारांनी हितगुज केले असता प्रांजळ मनाने पत्रकारांची संवाद साधला. ते म्हणाले की, मी पक्षासा ■ठी जिल्हा परिषद, पंचायत समिती,

विधानसभा विविध निवणुका लढवल्या असून कुठल्याही पदाची अपेक्षा केलेली नाही. पक्षाशी व ठाकरे घराण्याची एकनिष्ठ राहून मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी निश्चितपणाने पार पाडली आहे व पार पाडीत राहणार आ- हे. एकंदरीत सध्याचे खोक्याचं वातावरण पाहता पक्षप्रमुख हे निष्ठावंतांचा विचार निश्चितपणाने आगामी निवडणुकांमध्ये करणार हे तितकेच खरे आहे. मला स- द्धा भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघासाठी जो मतदारसंघ आजतागायत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला मानणारा असून विधानसभेची संधी मला मिळू शकते. याप्रसंगी प्रल्हाद आडागळे, श्रीनिवास जाधवर, सय्यद, विष्णू गवळी, बालाजी कुटे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक