तुगांव येथील जि.प.शाळेत मातापालक उद्बोधन मेळावा संपन्न*
तुगांव:- ता.धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इ .१ ली ते ३ री तील मातापालक गटाचा मेळावा आणि उद्बोधन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.विस्ताराधिकारी श्रीमती किशोरी जोशी यांच्या प्रेरणेने आणि केंद्रप्रमुख श्री. जगदीशजी जाकते यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे ( बालिकादिन ) औचित्य साधून शाळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .शंकरराव भुतेकर हे होते . यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला . सत्कारमूर्तीमध्ये गावच्या सरपंच कोमलताई शेंडगे , पोलीस पाटील सौ.श्रुतिकाताई हाजगुडे , माजी सरपंच अश्विनीताई काकडे , यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एन. एच.डुकरे सर यांनी केले. याप्रसंगी निपुण भारत कार्यक्रमांतर्गत उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले . FLN बद्दल श्री भगत सर , बालशिक्षण,बालआरोग्य व संगोपनबद्दल सौ.शैलाताई शेंडगे , idea video बद्दल सौ.जानकाताई भुतेकर , मातापालक उद्द्बोधनाचे प्रेझेंटेशन श्री.नवले बी.एस. यांनी सादरीकरण केले . श्री. चौगुले एस.बी.यांनी निपुण भारतच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. मुख्याध्यापक श्री प्रमोद अनपट यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल उपस्थितांना माहिती दिली तसेच सक्षम आणि सुसंस्कार संपन्न बालकाच्या जडणघडणीत मातेची भूमिका किती महत्त्वाची ठरते याबद्दल आग्रही प्रतिपादन केले . यावेळी केंद्रप्रमुख श्री. जाकते यांनी सावित्रीबाई फुले ययांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी वर्ग १ ते ३ मधील विद्यार्थ्यांच्या कृतीपत्रिकांचे तसेच मातापालकांनी बनविलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते अल्पोपहारानंतर दुपारच्या सत्रात मातापालकांच्या स्पर्धांचे आयोजन सखी - सावित्री समितीच्या सहकार्याने करण्यात आले . यात माता पालकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.सदरील स्पर्धाच्या आयोजनात सौ .श्रुतिकाताई हाजगुडे , सौ.रूपालीताई शेंडगे , सौ.राजकन्या भुतेकर , सौ.प्रीती हाजगुडे, सौ.मंदाकिनी भुतेकर , आशा कार्यकर्त्या यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पडवळ डी. एस.सर यांनी केले . यावेळी श्री.ए.बी.वैदय सर , श्री.एन. के.बचाटे सर यांनी प्रसिद्धी व नोंदणी विभागाची धुरा सांभाळली . विजेत्या स्पर्धक मातांच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता झाली.