राज्यातील ओ बी सी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचविणे बाबत आज जिल्हाधिकारी तसेचे खासदार आमदार यांना निदर्शने करून निवेदन दिले.

राज्यातील ओ बी सी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचविणे बाबत आज जिल्हाधिकारी तसेचे खासदार आमदार यांना निदर्शने करून निवेदन दिले.
धाराशिव
राज्य शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणापत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दि.26 जानेवारी 2024 नुसार मसूदा काढला आहे.त्यामुळे ओ बी सी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मुळ ओ बी सी वर अन्याय करणारा आहे.त्या बरोबर शिंदे समितीही घटनात्मक नसताना शिंदे समिति च्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणापत्र देणे हे घटना बाह्य आहे त्यासंदर्भात आमच्या काही हरकती आहेत.
मराठा समाजाच्या दबावाला बळी पडुन सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांच्यासाठी अन्याय कारक असलेल्या या निर्णयाला आमचा विरोध आहे.तरी दि.26 जानेवारी 2024 आदि सुचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा,राज्य मागासवर्गीय आयोग व न्या.शिंदे समिती रदद् करण्यात यावी तसेच चुकिच्या कार्यपध्दती ने व बेकायदेशीर रित्या वितरीत होणाऱ्या सदर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणापत्राच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी.आणि राज्यातील गोरगरीब ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे हि विनंती.

धाराशिव कळंब आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या कार्यालयावर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी  घोषणाबाजी करून निवेदन देण्यात आले.यावेळी ओबीसी समाज बांधवांना आमदार कैलास पाटील यांनी संबोधीत केले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्यालयावर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी घोषणाबाजी व निवेदन देण्यात आले.अधिवेशनात खासदार साहेब असल्याने पी ए बालाजी सावंत यांनी निवेदन स्विकारले.

अधिनियम 2000 दि.26 जानेवारी 2024 या अधिसुचनेच्या मसुद्याला विरोध असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात येथे जिल्हाभरातील आलेल्या पदाधिकारी यांना हरकतिचा फाॅर्म भरून घेतला व त्याच्या प्रति तालुक्याला देऊन भरून घेण्याचे आवाहन केले.

या निवेदनावर समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,धनगर समाजाचे नेते दत्ता बंडगर,माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षिरसागर, धाराशिव समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खुणे,कुंभार समाजाचे नेते मुन्ना खटावकर,समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष डोरले, धाराशिव गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे,समता परिषदेचे कळंब तालुकाध्यक्ष प्रशांत वेदपाठक, तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रदिप राऊत,तेली समाज संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे,तेली समाज संघटनेचे मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नवगिरे,लोहारा तालुकाध्यक्ष राम जाधव,भूम तालुकाध्यक्ष सचिन माळी,धाराशिव ढोकी पांडुरंग माळी,तेली समाजाचे जेष्ठ लक्ष्मण निर्मळे,महादेव मेंगले, दादासाहेब घोडके,प्रविण घोडके,मुन्ना सुरवसे,भुम शहराध्यक्ष रविकांत माळी,परंडा महादेव लोकरे,शिवा संघटना तालुकाध्यक्ष भूम  प्रविण शेटे, संतोष यादव,सुनिल माळी,सचिन जाधव, सचिन दिक्षित,निलेश धनवे,धनंजय शेट्टे,युवराज पवार यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक