वात्सल्य हॉस्पिटल उस्मानाबाद येथून तेरा दिवसाचे बाळ ऑपरेशन होऊन सुखरूप रित्या घरी गेले .

वात्सल्य हॉस्पिटल उस्मानाबाद येथून तेरा दिवसाचे बाळ ऑपरेशन होऊन सुखरूप रित्या घरी गेले .
धाराशिव- सांगायचं काय यात की ,एक दिवसाच्या बाळाला (imperforate Anu’s intermediate type)त्याची संडासची जागा तयार झाली नाही म्हणून ऑपरेशन करण्याची गरज होती त्याची पहिली तीन बाळ अशीच काही व्यंग असल्यामुळे दगावली होती ,या बाळाची डिलिव्हरी उस्मानाबाद येथील पार्वती हॉस्पिटल येथे झाली तेथून हे बाळ वात्सल्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले, उपचारासाठी आल्यानंतर त्या बाळाच्या आई-वडिलांच्या  ( Sangita & Fakira Bhoyal resident of osmanabad)डोळ्यात फक्त एकच इच्छा होती की आम्हाला आमचे एक तरी बाळ जगायला हवे.
 तेव्हा त्यांचे समुपदेशन करून आपण त्या बाळाचे ऑपरेशन वात्सल्य हॉस्पिटल येथे करण्याचे ठरवले ,त्यासाठी सोलापूर येथून डॉक्टर तडवळकर सर यांनी वात्सल्य हॉस्पिटलमध्ये येऊन त्या बाळाचे ऑपरेशन सक्सेसफुली केले.
 त्यानंतर तेरा दिवस पूर्ण उपचार देऊन त्या बाळाला आज सुखरूप रित्या घरी सोडण्यात आले
बाळाचे उपचार पूर्णपणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजनेतून मोफत झाले

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक