मराठा महिला मंचच्यावतीने आदर्श माता व उद्योजिकांचा सन्मान सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना शेख, मुक्ता लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - राजमाता जिजाऊ व माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त मराठा महिला मंचच्यावतीने १२ आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन दि.१३ जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात येणाऱ्या आव्हानाला परतवून परिस्थितीवर मात करून कुटुंबाला भरभक्कम आधार देणाऱ्या व समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आदर्श माता, आदर्श उद्योजिका व आदर्श व्यवस्थापिका यांचा‌ आयोजक मनिषा राखुंडे-पाटील यांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना शेख, मुक्ता लोखंडे यांच्या हस्ते हवालदार सरोजा शिंदे, डाॅ वृदाराणी विधाते, डाॅ अंजली बुरगुटे व सरोजा शिंदे, सुषमा दुगम, सीमा नवले, सुनिता म्हस्के, विद्या पडवळ, कविता काळे, मंदाकिनी माकोडे, वृंदाराणी विधाते, सुवर्णा काकडे, अनघा गोडगे, संगीता शेंडगे यांचा पुष्पगुच्छ व जिजाऊ सावित्री यांच्या कार्याचे पुस्तक देऊन तसेच फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक