एन.व्हि.पी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याचे १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीतील शेतकऱ्यांचे ऊसाचे २८००/- रु प्रमाणे बील बँकेत वर्ग*
*एन.व्हि.पी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याचे १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीतील शेतकऱ्यांचे ऊसाचे २८००/- रु प्रमाणे बील बँकेत वर्ग*
गळीत हंगाम २०२३-२४ मधिल १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीतील गाळपास आलेल्या ऊसाचे २८००/- प्रमाणे बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवाडी बिल काढताना विलंब न करता पंधरवडा संपल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर बील जमा केले.
एन व्हि पी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याने 42 हजार 600 मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पार केला आहे.याच कारखान्याने आत्तापर्यंतचे सर्व बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
तरी शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.