एनव्हीपी शुगरचा चाचणी हंगामात 57 हजार मे.टन गाळपाचा टप्पा पार**1 ते 15 जानेवारीपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल शेतकर्‍यांच्या खात्यात जमा*

*एनव्हीपी शुगरचा चाचणी हंगामात 57 हजार मे.टन गाळपाचा टप्पा पार*
*1 ते 15 जानेवारीपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल शेतकर्‍यांच्या खात्यात जमा*

धाराशिव-
तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्यास 1 ते 15 जानेवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे 2800 रुपयाप्रमाणे बिल संबंधित ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. शेतकर्‍यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपल्या खात्यावरील बिल घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

धाराशिव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची गरज ओळखून जागजी शिवारात बालाजी उर्फ नानासाहेब पाटील यांनी जागजी शिवारात एनव्हीपी शुगर या कारखान्याची उभारणी केली आहे. विशेष म्हणजे एनव्हीपी शुगर या कारखान्याला चाचणी गळीत हंगामात शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या मोळीपासून आतापर्यंत 57 हजार मे.टन गाळपाचा टप्पा कारखान्याने पूर्ण केला आहे. गाळप सुरु झाल्यापासून शेतकर्‍यांनी ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत संबंधित शेतकर्‍याच्या खात्यात ऊसबिल जमा करण्यात येत आहे. 

चाचणी गळीत हंगाम सुरु झाल्यापासून गाळपास आलेल्या ऊसाची रक्कम पंधरा दिवसांच्या आत संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे चाचणी हंगामातच एनव्हीपी शुगर कारखाना शेतकर्‍यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 855 शेतकरी यांचा ऊस गाळप करून शेतकऱ्यांचे हित एन व्ही पी कारखान्याने जोपासले आहे.आता 1 ते 15 जानेवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे देखील 2800 रुपयाप्रमाणे बिल ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या शाखेत जमा करण्यात आलेले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक